Shark Tank Amitabh Bachchan esakal
मनोरंजन

Sharks Tank offers: खास महिलांसाठी बिग बीं ची 'बिझनेस आयडिया', शार्क टँककडून एवढ्या कोटींची ऑफर!

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीमध्ये शार्क टँक चे सगळे जज सहभागी झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

Shark Tank special deal Amitabh Bachchan bollywood : बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीमध्ये शार्क टँक चे सगळे जज सहभागी झाले होते. त्याच्या प्रमोशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये अमिताभ यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवले आहे. नेटकरीही अमिताभ यांची ती बिझनेस आयडिया ऐकून अवाक् झाले आहे.

देशात सध्या शार्क टँकची मोठी चर्चा आहे. सोशल मीडियावर तर शार्क टँकची नेहमीच चर्चा होताना दिसते. त्याचा प्रोमो व्हायरल झाला आहे. अमिताभ यांनी यावेळी आपण देखील एक खास प्रॉडक्ट लाँच करण्याचा विचार करत असून ते खास महिलांसाठी असल्याचे म्हटले आहे. बिग बीं चा तो व्हिडिओ नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे.

Also Read: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

अमिताभ यांची बिझनेस डील लॉक

सध्या सोशल मीडियावर अमिताभ यांचा तो व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते शार्क टँकमध्ये गेल्याचे दिसून आले. त्या प्रोमोमध्ये अमिताभ हे हातात टिश्यु पेपरचा बॉक्स घेऊन येतात. आणि सांगतात की, खास महिलासांठी एबी टिश्यु पेपरचा ब्रँड मी घेऊन येतो आहे.. त्यावर त्या शो मध्ये सहभागी झालेले जज यांनाही कमालीचा आनंद होतो. साक्षात बिग बी हे जेव्हा एखादा ब्रँड सुरु करणार असल्याचे सांगतात तेव्हा त्यांनी तातडीनं आपण ही डील घ्यायला तयार असून आम्ही त्यासाठी शंभर कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगतात.

बिग बी यांच्या त्या प्रपोझलवर अनुपम मित्तल म्हणतात की, जर अमिताभ यांच्या नावानं हा टिश्यु पेपर बाजारात येणार असेल तर शंभर कोटी लावायला तयार आहोत. त्यावर अमिताभ म्हणतात की, मला त्या शंभर कोटींमधील २५ टक्के अॅडव्हान्स रक्कम सायनिंग अमाउंट म्हणून मिळाली तर बरं होईल. या व्हिडिओला आतापर्यत हजारो व्ह्युज आले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकप्रिय रियॅलिटी शो म्हणून शार्क टँकला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले. हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानं प्रेक्षकांना मोठा आनंद झाला होता. एका आगळ्या वेगळ्या विषयावर आणि संकल्पनांवर आधारित असलेल्या या रियॅलिटी शो ने प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. भारतात उद्योगव्यवसायात किती मोठी संधी आहे, किती नवउद्योजक आहे याविषयीची माहिती आणि त्यांच्यात दडलेली सर्जनशीलता या शो च्या निमित्तानं समोर आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT