serial
serial 
मनोरंजन

झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेतील 'ती' पुन्हा येणार 'रसिकां'च्या भेटीला

सकाळवृत्तसेवा

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी रसिका सुनील आता पुन्हा या मालिकेत परत येत आहे. फिल्म मेकिंगच्या शिक्षणासाठी रसिका सुनील अमेरिकेत गेली होती. त्यामुळे शनायाची भूमिका इशा केसकर ही अभिनेत्री साकारत होती. परंतु रसिका आता येथे परतली आहे आणि ती या मालिकेत
सहभागी होणार आहे.

शनायाची काहीशी नटखट आणि चुलबुली अशी भूमिका साकारून रसिका सुनीलने चांगलीच लोकप्रियता मिळविली होती. ईशा केसकरनेदेखील या भूमिकेचे बेअरिंग चांगले पकडले होते. तिलाही प्रेक्षकांनी चांगली पसंती या भूमिकेत दिली होती. परंतु आता रसिका पुन्हा या मालिकेत सहभागी होत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे. ती परत येतेय
म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावलल्या आहेत. कारण आता ती नव्याने काही तरी कारस्थाने करणार आहे हे नक्की आहे. त्यामध्ये गुरुनाथची अवस्था आणखीन बिकट होणार आहे.

स्वतःच्या नवऱ्यावर प्रेम करणारी आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी असणारी राधिका आणि राधिकाच्या नवऱ्याला स्वतःच्या तालावर नाचविणारी नखरेल शनाया व त्यामध्ये गुरुनाथची होणारी घुसमट यामुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. या तिन्ही व्यक्तिरेखा कमालीच्या लोकप्रिय ठरल्या आहेत. आता या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारी नियम आणि अटींनुसार हे चित्रीकरण पार पडत आहे. 

She from the popular Zee Marathi series will come again to meet viewers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT