Shekhar Kapur Reveals He Used ChatGPT To Write Story  esakal
मनोरंजन

Masoom 2 : Chat GPT कडून अवघ्या ३० सेकंदात स्क्रिप्ट तयार, पण....! प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केला मोठा खुलासा

चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांचा बहुचर्चित चित्रपट मासूमच्या सिक्वेलवर काम करत असल्याचे म्हटले होते.

युगंधर ताजणे

Shekhar Kapur Reveals He Used ChatGPT To Write Story : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर हे आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. त्यांनी त्यांच्या आगामी मासूम २ या चित्रपटासाठी चॅट जीपीटीची मदत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यावर त्यांनी आता खुलासाही केला आहे.

चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांचा बहुचर्चित चित्रपट मासूमच्या सिक्वेलवर काम करत असल्याचे म्हटले होते. कपूर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटातील प्रसंग शेअर केला आहे आणि स्पष्ट केले की त्यांनी Chat GPT ला मासूम २ साठी एक कथा लिहिण्यास सांगितले होते.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली

मिस्टर इंडिया, बॅंडिट क्वीन आणि एलिझाबेथ यांसारखे चित्रपट शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केले आहेत. Chat GPTचा वापर केल्यानंतर, चित्रपट आणि त्याच्या विषयाबद्दल AIच्या आकलनक्षमतेने ते आश्चर्यचकीत झाले. असे त्यांनी सांगितले.

"AI(आर्टिफिशिअल इंटेलिजन्स)बद्दल खूप चर्चा सुरु आहे आणि कसं ते सर्जनशील लेखन सुद्धा उत्तम करु शकतं, म्हणून मी ते वापरून पहायचं मी ठरवलं. मी Chat GPTला, माझा पुढचा चित्रपट, मासूम २ साठी एक कथा तयार करायला सांगितले. ...आणि चित्रपट आणि त्याच्या विषयाबद्दल AIच्या आकलनक्षमतेने मी आश्चर्यचकीत झालो." असे ते म्हणाले.

"AIच्या कथेनुसार राहुल(जुगल हंसराज) त्याच्या वडिलांनी त्याला का नाकारले म्हणून नेहमी चिडून असायचा...पण नंतर तोमोठा होउन लग्न करतो...पण जोपर्यंत त्याला स्वतःची मुलं होत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या वडिलांवरील दबावाची जाणीव होत नाही, जेव्हा ते पहिल्यांदा एकमेकांना भेटतात तेंव्हा त्यांच्यावर असते...आणि शेवटी त्याच्या वडिलांना माफ करतो.

नशीब माझी कथा AI पेक्षा चांगली आहे...तरीही लक्षात ठेवा की ChatGPT व्हिडिओ पाहत नाही...पण ३० सेकंदात मासूमबद्दल लिहिलेलं सर्व काही वाचलं...आणि हातचालाखीने लहान राहुलसाठी एक विश्वासार्ह पेटप्रसंग तयार केला... तो ही ३० सेकंदात", पुन्हा, आणि कृतज्ञतापूर्वक, AI माझ्यापेक्षा चांगली आणि अधिक भावनिक कथा घेऊन येऊ शकले नाही.. म्हणून मी अजूनही AI पेक्षा कितीतरी जास्त सर्जनशील आहे. असे कपूर यांनी म्हटले आहे.

लेखक हॉलिवूडमध्ये आंदोलनं का करत आहेत हे मला कळू शकते... कारण वरवर पाहता एआय मालिकेच्या भागांसाठी एक विश्वासार्ह कथा देण्यास सक्षम आहे! ओह! AIमाझ्या सर्जनशीलतेला समोरं जाण्याआधी मी आणखी काही चित्रपट वेगानं बनवू इच्छितो,” असेही कपूर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मासूमबद्द्ल सांगायचे झाल्यास.....

१९८३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट गुलजार यांनी लिहिला आहे. एरिक सेगलच्या मॅन, वुमन अॅंड चाइल्ड या कादंबरीचे रूपांतर हा चित्रपट आहे. हा चित्रपट एक विवाहित जोडपे आणि त्यांच्या दोन मुलींभोवती फिरतो ज्यांचे आयुष्य एका मुलाच्या आगमनाने विस्कळीत होते. या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, जुगल हंसराज, सुप्रिया पाठक, सईद जाफरी आणि उर्मिला मातोंडकर यांच्या भूमिका होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मुंबईत मुसळधार पावसाचा आढावा, उपमुख्यमंत्री शिंदे यांची आपत्कालीन कक्षास भेट

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास दिली भेट

Tejashwi Yadav : ''महाआघाडी 2029मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान बनवणार'' ; तेजस्वी यादव यांनी केली घोषणा, मात्र...

Mumbai Rain Update: डोंबिवली रस्ते पाण्याखाली, खासदारांच्या घरातही पाणी शिरलं, पाहा परिस्थिती

Asia Cup 2025 India Squad: शुभमन गिलमुळे यशस्वी जैस्वालवर अन्याय? सूर्यकुमार यादवने सांगितलं का केलं त्याला उपकर्णधार

SCROLL FOR NEXT