shekhar suman commented on milind soman bold photoshoot 
मनोरंजन

'मिलिंदचं वय वाढलं,त्याचा बालिशपणा काही गेला नाही'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - गोव्याच्या समुद्रकिनारी जन्मदिनाच्या निमित्ताने एक बोल्ड फोटो काढून तो मिलिंदने सोशल मीडियावर शेयर केला. आता त्याच्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र बॉलीवूडमधल्या काही कलाकारांनी त्याच्यावर टीका केली आहे. प्रसिध्द अभिनेता व निवेदक शेखर सुमन यांनी त्याच्या अशा प्रकारच्या वागण्यावर परखड प्रतिक्रिया दिली आहे.

मिलिंदच्या त्या बोल्ड फोटोशुट प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे त्याच्या अगोदर अभिनेत्री पुनम पांडेवरही सार्वजनिक ठिकाणी बोल्ड व्हिडीओ शुट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन सोशल मीडियामध्ये या दोघांनाही टीकेला सामोरं जावं लागलं आहे. या प्रकरणावर अभिनेता शेखर सुमन यांनी व्टिटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी शेलक्या शब्दांत मिलिंदच्या अशाप्रकारच्या कृतीवर बोट ठेवलं आहे. ते म्हणाले,  “मिलिंदचं वय ५५ झालं आहे पण त्याच्या कृती बालिशच आहेत. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

‘मिलिंद सोमणनं सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतीमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे,’ असं म्हणत गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 4 नोव्हेंबर रोजी आपल्या 55 व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता.

या अगोदर गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर बोल्ड व्हिडीओ शुट केल्याप्रकरणी पूनम पांडेला अटक करण्यात आली होती. दुसरीकडे समुद्र किनाऱ्यावर बोल्ड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम 294 आणि सेक्शन 67 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral Video : मुंबई मेट्रोची अमेरिकेन महिलेला भुरळ; व्हिडिओ शेअर करत म्हणाली- अमेरिकेने भारताकडून शिकले पाहिजे

Nashik Crime: सुटकेस मर्डर मिस्ट्रीचा छडा! घटस्फोटीत प्रेयसीला चारित्र्याच्या संशयावरून संपवलं, आरोपीची दुसरी पत्नी गर्भवती

हरवलेल्या मुलीचं रहस्य की भास? ‘दृश्य अदृश्य’मध्ये उलगडणार थरारक सत्य, पूजा सावंत-अशोक समर्थ यांची दमदार केमिस्ट्री

BEST Bus Strike Mumbai : बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, बससेवा विस्कळीत; राज्य सरकारने संपावर घातली बंदी

Big News: भारताच्या संघात अचानक बदल, IND vs AFG तिसऱ्या वन डेसाठी स्टार खेळाडूची एन्ट्री... कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT