shekhar suman mother passed away  Team esakal
मनोरंजन

मी आता अनाथ झालोय, शेखर सुमन यांना मातृशोक

सुमन यांनी जी पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी लिहिलंय,

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता, निवेदक शेखर सुमन (bollywood actor shekhar suman) यांच्या आईचे निधन झाले आहे. (mother passed away) सुमन यांनी सोशल मीडियावर याविषयी पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. सुमन यांच्या आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. अखेर त्यांचे वार्धक्यानं निधन झालं आहे. सुमन यांनी जी पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी लिहिलंय, माझी आई जी माझ्यावर खूप प्रेम करत होती. ती आता गेली आहे. तिच्या जाण्यानं मी पोरका झालो आहे. (shekhar suman mother passed away actor feel orphaned )

माझ्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांना सामोर जायच धाडस तिच्यामुळे माझ्यात आलं. आणि त्यामुळे मला आयुष्यात मोठं यश संपादन करता आलं. त्याचं श्रेय माझ्या आईला आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यत तुला आठवणीत ठेवेल. आजीच्या निधनावर नातू अध्ययननंही (adhyayan) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यानं आपल्या आजीला श्रद्धांजली वाहिली आहे. आजी स्वभावानं फार कणखर होती. तिची शेवटच्या श्वासापर्यत लढाई सुरु होती. ती आता आमच्यातून गेली आहे. तिला भावपूर्ण श्रद्धांजली.

शेखर सुमन यांची आई गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त होत्या. त्यांचे किडनी ट्रान्सप्लांटही झाले होते. अध्ययननं ही माहिती सोशल मीडियावरुन पोस्ट केली होती. त्यावेळी त्यानं लिहिले होते, फार कमी लोकांना हे माहिती आहे की, मी दर बुधवारी मंदिरात जातो. आणि गणपतीचा आशीर्वाद घेतो. त्याच्याकडे माझ्या आजीच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना करतो. तुम्ही सर्वजण माझ्या आजीसाठी प्रार्थना करा. या शब्दांत त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

मागील महिन्यात शेखर सुमन यांच्या सासुचेही कोरोनानं निधन झाले होते. आता त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. काही बॉलीवूड सेलिब्रेटींनी त्यांचे सांत्वन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News: भात आणि ऊस कापणीच्या काळात कोल्हापुरात ४० जणांचा सर्पदंशाने मृत्यू.

Latest Marathi News Live Update : परळीत मुंडे समर्थकांचे आंदोलन; मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Yoga for Diabetes and Hernia: फक्त पचनासाठी नाही तर मधुमेह अन् हार्नियावरही प्रभावी ठरते 'हलासन'; जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

मनसेसोबत युती करणार का? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला, मविआच्या नेत्यांना दिला सल्ला

Kolhapur Guns License : कोल्हापूर जिल्ह्यातील परवानाधारक पाच हजार बंदुका जमा करण्याचे आदेश, काय आहे कारण

SCROLL FOR NEXT