Shekhar Suman
Shekhar Suman Google
मनोरंजन

'सुशांत प्रकरणात सीबीआयनं मला खूप त्रास दिला...'; शेखर सुमनचा मोठा खुलासा

प्रणाली मोरे

सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh rajput) केसप्रकरणात शेखर सुमनने(Shekhar Suman) आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं . इतकंच नाही तर त्यावेळी शेखर सुमननं बॉलीवूड संदर्भातही काही स्फोटक वक्तव्य केली होती. शेखर सुमननं बॉलीवूडमधील ग्रुपीझम आणि नेपोटिझम वर देखील मतप्रदर्शन केलं होतं. सुशांत सिंग राजपूतच्या निधना दरम्यान खरतंर शेखर सुमन इंडस्ट्रीत कुठल्याच प्लॅटफॉर्मवर सक्रिय नव्हते. आता खूप मोठ्या ब्रेकनंतर शेखर सुमन मनोरंजन क्षेत्रात कमबॅक करीत आहेत. अर्चना पुराण सिंग सोबत ते परिक्षकाच्या खूर्चीत विराजमान होणार आहेत. याच नव्या इनिंगच्या निमित्तानं शेखर सुमन यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीपासून दूर राहण्यामागील कारणाचा खुलासा केला आहे.

या मुलाखतीत शेखर सुमन इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचं कारण सांगताना म्हणाले,''कदाचित मी मनोरंजन क्षेत्रातील ग्रुपिझम,नेपोटिझम यावर स्पष्ट मत मांडलं किंवा सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला यामुळे इंडस्ट्रीतील काही लोकं माझ्यावर नाराज झाले असावेत आणि त्यामुळे मला कामं मिळाली नसावीत. पण मी या गोष्टींचा विचार करत नाही. कारण जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टींविरोधात बिनधास्त होऊन बेधडकपणे आपला आवाज उठवता तेव्हा घाबरण्याचं काहीच कारण नसतं. मला माहित आहे जर कुणी आपलं नुकसान केलं तर त्यातून नवा मार्ग कसा शोधायचा. मी मागे हटणाऱ्यांपैकी नाही''.

शेखर पुढे म्हणाले,''आपली केवळ आपल्या कुटुंबाप्रती नाही तर समाजाप्रती देखील जबाबदारी असतात. फक्त शांत बसून आपण तमाशा नाही पाहू शकत. कोणाला ना कोणाला तरी बोलावच लागणार. पुढाकार घ्यावाच लागणार. जर तुम्ही आवाज केलात तरच समोरचा गप्प बसेल. जर तुम्ही विचार केलात की समोरचा बोलतोय,आपण शांत बसूया मग तो कदाचित गप्प बसेलही. पण असं झालं तर समाजात बदल होणार नाही,पुनरावृत्ती होतच राहिल. समाज सुधारणार नाही. मी जेव्हा माझं मत मांडतो तेव्हा हा विचार करीत नाही की माझं यामुळे काय नुकसान होईल. फक्त मी माझ्या मनाचं त्यावेळी ऐकतो. आता राहिला मुद्दा कामाचा,तर मग जोपर्यंत माझ्यात टॅलेंट आहे,मला कोण थांबवू शकत नाही. आपल्याला परमेश्वर सगळं देतो,तुम्ही कोण आहात माझ्यापासून काम हिरावून घेणारे''.

सुशांतच्या मुद्दयावर उदाहरण देताना शेखर सुमन म्हणाले,''सुशांतसोबत जे घडलं ते खूप दुःखदायक होतं. कदाचित त्यानं आपला जीव त्याच कारणांमुळे दिला असावा. तो इतका कंटाळला होता त्या सगळ्या गोष्टींना. एकतर त्याच लोकांनी त्याला इंडस्ट्रीतून काढायचा प्लॅन केला आणि मग त्याला वाटलं की आपण स्वतःचा जीव द्यावा. खरंतर तुम्ही-आम्ही यातून शिकायला हवं आणि ही चूक पुन्हा करता कामा नये. 'मी टू' मोहिमेनं कस्टिंग काऊचमागचं घाणेरडं सत्य जगासमोर आणलं होतं. ते बंद व्हायलाच हवं होतं. आपल्या इंडस्ट्रीला यावर गंभीरपणे विचार करायला हवा. बॉलीवूड शब्द मला खटकतो. सगळं बनावट वाटतं तो शब्द ऐकला की. भारतीय फिल्म इंडस्ट्री जी आपली आहे तीचं देखील यांनी हॉलीवूड करून टाकलं आहे. याला बॉलीवूड म्हणतात का? हसं बनवलंय सगळ्याचं''.

सुशांतच्या वेळेस तर जणून एक वादळच आलं होतं. याविषयी बोलताना शेखर सुमन यांनी थेट सीबीआयवर आरोप केले आहेत. शेखर सुमन म्हणाले,''आपला कशावरच कंट्रोल नसतो. न्याय आपण करू शकत नाही. आपल्या हातात केवळ सत्याच्या बाजूने उभं राहणं असतं. वादळ काही काळापुरतं येतं पण नंतर दुसऱ्या दिशेनं निघून जातं. कदाचित सुशांतच्या वेळेस आलेलं वादळ जरी शांत झालं असलं तरी ते पुन्हा कधीही आपलं डोकं वर काढू शकतं. हे वेळच सांगेल. मी फक्त आवाज उठवला होता. फक्त म्हटलं होतं की,पोलिसांना या केसला व्यवस्थित सांभाळता येत नाही आहे. सीबीआयनं दखल घ्यावी,ते गरजेचं आहे. आणि आम्ही काही जणांनी केलेली ती मागणी पूर्णही झाली. सीबीआय कडून खूप अपेक्षा होत्या,पण त्यांनी देखील नाराज केलं. त्यांनी दखल घेतल्यानंतरही काहीच हाती लागलं नाही,पुरावे सापडलेच नाहीत. मला मात्र तेव्हा खूप त्रास दिला सीबीआयनं. आता आम्ही वाट पाहत आहोत, पुन्हा न्यायासाठी आवाज उठवू,आम्हालाही पहायचं आहे सत्य कधीपर्यंत लपवून बसतंय. हे समोर आलं तरच आपण सगळे एका योग्य मार्गाने पुढे जाऊ शकतो''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT