शिबानी दांडेकर  
मनोरंजन

बॉयफ्रेंडसाठी काही पण, शिबानीनं जे केलं त्याची चर्चा...

बॉलीवूडच्या bollywood star स्टारचा काही भरवसा नसतो तो यासाठी की ते प्रसिद्धीसाठी नेहमी हटके प्रकार करताना दिसतात.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडच्या bollywood star स्टारचा काही भरवसा नसतो तो यासाठी की ते प्रसिद्धीसाठी नेहमी हटके प्रकार करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर social media अशा सेलिब्रेटींची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यामुळे त्या सेलिब्रेटींच्या चाहत्यांचा त्यांना प्रतिसादही मिळताना दिसतो आहे. अभिनेत्री आणि मॉडेल शिबानी दांडेकर shibani dandekar सध्या चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं आपल्या बॉयफ्रेंडसाठी एक वेगळं गिफ्ट दिलं आहे. त्यातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. दुसरीकडे ती ट्रोलही झाली आहे. तिच्या बॉयफ्रेंडची काही वेगळी ओळख करुन द्यायची गरज नाही. तो सध्याच्या घडीला बॉलीवूडमधला आघाडीचा दिग्दर्शक आणि अभिनेताही आहे. त्याच्या तूफान चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर farhan akhtar शिबानी दांडेकर हे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ते नेहमी त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोही शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. असाच एक फोटो शिबानीनं शेयर केला आहे. त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. शिबानीनं आता फरहानच्या नावाचा एक टॅटू बनवून घेतला आहे. त्यामुळे तिच्यावर एकीकडे कौतूकाचा वर्षाव होत होतोय, तर दुसरीकडे तिलाही ट्रोलही केलं जात आहे.

शिबानीचा (Shibani Dandekar Birthday) आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं काही फोटोही शेयर केले आहेत. या दिवसाच्या निमित्तानं तिनं मानेवर फरहानच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला आहे. त्याचे काही फोटोही तिनं सोशल मीडियावर शेयर केले आहेत. ज्याची सगळीकडे चर्चा आहे. तिनं आपल्या हातावर देखील एक टॅटू गोंदवुन घेतल्याचे दिसुन आले आहे. तिच्या त्या फोटोंची चर्चा सगळीकडे आहे. अनेकांनी तिचं कौतूकही केलं आहे. तिच्या चाहत्यांनी तिला जन्मदिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. फरहानच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचं झाल्यास त्यानं २००० मध्ये अधूना भबानीशी लग्न केलं होतं. आणि २०१७ मध्ये ते एकमेकांशी वेगळे झाले होते. त्यानंतर त्याची आणि शिबानीची ओळख झाली. त्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यांचे अनेक फोटो यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT