actress shilpa shetty house Team esakal
मनोरंजन

'अख्ख्या कुटूंबाला कोरोना, घरच सॅनिटाईज करावं लागलं'

मात्र तिला तेव्हा आपलं संपूर्ण घर सॅनिटाईज करावं लागलं होतं.

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनानं आता सर्वांना काळजीत टाकलं आहे. त्याचा दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव सर्वांसाठी धोक्याची घंटा ठरताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना आधार देण्यासाठी बॉलीवूडचे सेलिब्रेटी मैदानात उतरले आहे. त्यांनी लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहनही केले आहे. काही सेलिब्रेटींच्या घरात कोरानानं शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (shilpa shetty ) कोरोना (corona) झाला होता. केवळ तिलाच नाही तर तिच्या संपूर्ण फॅमिलीली कोरोनाची लागण झाली होती.(shilpa shetty home sanitised after her family recovers from covid)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (post share on social media) एक पोस्ट शेअऱ केली होती. त्यात तिनं आपल्या फॅंमिलीला झालेल्या कोरोनाविषयी माहिती दिली होती. त्यावेळी तिनं आपण त्यांची कशाप्रकारे काळजी घेतो हे तिनं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते. कोरोनाच्या दरम्यान कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा हे ही शिल्पानं यावेळी सांगितलं होतं. तिच्या या पोस्टला सर्वांची पसंती मिळाली होती. आताही तिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

shilpa shetty house

शिल्पाची पूर्ण फॅमिली कोरोनाबाधित झाली होती. मात्र त्या प्रसंगाला तिनं मोठ्या धैर्यानं तोंड दिल होतं. आता तिची फॅंमिली कोरोनातून बाहेर आली आहे. मात्र तिला तेव्हा आपलं संपूर्ण घर सॅनिटाईज करावं लागलं होतं. याची माहिती तिनं सोशल मीडियावरुन व्हायरल केली आहे. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सर्वाधिक काळ अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे.

शिल्पाच्या त्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती तिचं घर सॅनिटाईज (sanitisation) करताना दिसत आहेत. त्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये शिल्पानं लिहिलं आहे की, कोविडमधून बाहेर आल्यानंतर संपूर्ण घराचे सॅनिटायझेशन केले आहे. तिच्या त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. चाहत्यांनी त्या व्हिडिओला पसंत केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून आपण मोठया संकटाशी झुंजत होतो. अखेर त्यातून बाहेर आल्याचे समाधान तिनं व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीन पिढ्या पक्षाचं काम करतोय, धड नाव लिहिता न येणाऱ्यांना तिकीट; भाजपचे नाराज आक्रमक, पोलीस बोलावण्याची वेळ

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! अखेर महायुती तुटली, भाजप-शिवसेनेत फूट...सत्ता समीकरणे कोलमडणार की विरोधकांची लॉटरी लागणार?

“साहेब, मी नोकरी सोडली अन् तिकीट गद्दारांना?” छत्रपती संभाजीनगरमध्ये निष्ठावंत BJP कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पेट्रोल कॅनसह आक्रमक आंदोलन

Alternative Food Apps : 31 डिसेंबरला Swiggy-Zomato संपामुळे बंद; आता कुठून ऑर्डर करू शकता जेवण? हे आहेत स्वस्तात मस्त पर्यायी ॲप

रामानंद सागर यांना धमकावायला चक्क काठ्या घेऊन गेलेले छोटेसे लव-कुश; दोघांना साप दाखवून केले जायचे सीन

SCROLL FOR NEXT