Raj Kundra Corona Positive Instagram
मनोरंजन

Raj Kundra: नाक काय अख्खं तोंड झाकूनही राज कुंद्राला कोरोना.. नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राला कोरोना झाल्यानंतर सोशल मीडियावर मात्र लोकांना अनेक प्रश्न पडले आहे. मजेदार कमेंट्स वाचायला मिळत आहेत.

प्रणाली मोरे

Raj Kundra: कोरोना पुन्हा आपलं डोकं वर काढत आहे. देशभरात आता पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सरकारनं देखील त्या त्या राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता नियमावली जाहीर केल्याचं याआधीच समोर आलं आहे.

सर्वसामान्यच नाहीत सेलिब्रिटीही कोरोनाशी पुन्हा झगडताना दिसत आहेत. याआधी सेलिब्रिटींमधनं अभिनेत्री किरण खेर आणि पूजा भट्ट यांना कोराना झाल्याचं समोर आलं होतं. आता बातमी कानावर पडतेय की शिल्पा शेट्टीचा नवरा बिझनेसमन राज कुंद्रा याला देखील कोरोना झाला आहे.(Shilpa Shetty Husband businessman Raj Kundra Corona Positiv)

राज कुंद्रा कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं सध्या तो आयसोलेशन मध्ये असून कुटुंबियांपासून दूर आहे. राज कुंद्राला कोरोना झाल्यानंतर आता सोशल मीडियावर मात्र लोकांना अनेक प्रश्न पडले आहेत.

ज्याच्याकडे वेगवेगळ्या मास्कचा भरणा आहे..ज्यानं कोरोनाचा वरचष्मा असताना जो मास्क चढवलाय तो अद्याप काढलेलाच नाही तरी देखील त्याला कोरोना कसा झाला असे प्रश्न लोक विचारताना दिसत आहेत.

एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे,'पूर्ण शरीराला मास्क चढवल्यासारखे कपडे घालतो तरी याला कोरोना झालाच कसा?' तर आणखी एकानं लिहिलं आहे-'अतिकाळजी भोवली...मास्क सतत घातल्यानं श्वास घ्यायचा त्रास झाला असेल'.

तसं पाहिलं तर राज कुंद्रा पॉर्न केसप्रकरणातून जेल मधून सुटला तेव्हापासून विचित्र विचित्र मास्क घालून सार्वजनिक ठिकाणी दिसला आहे. त्याच्या त्या मास्कवरनं अनेकदा त्याला ट्रोल केलं गेलं आहे. अलिकडेच तो मास्क नं घालता काही फोटोत आणि व्हिडीओतनं दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: ठाकरे ब्रँण्डला नागरिकांनी नाकारले आहे- मुख्यमंत्री

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT