Shilpa Raj Shetty esakal
मनोरंजन

Shilpa Raj Kundra:'बायकोमुळं तुला किंमत नाहीतर कोण विचारतो'!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात.

सकाळ डिजिटल टीम

Shilpa Shetty Husband Raj Kundra: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात. पॉर्न व्हिडिओ केस प्रकरणात राज कुंद्राचे नाव आले होते. ते प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असून राज हा जामिनावर बाहेर आहे. मात्र त्यावरुन राजची खूप बदनामी झाली. याचा सर्वाधिक फटका शिल्पाला बसला होता. तिच्या इमेजला मोठा धक्का बसला होता. वेगवेगळ्या रियॅलिटी शोमध्ये शिल्पाचा असणारा टीआरपी कमी झाला होता.

राजच्या त्या प्रकरणानंतर सोशल मीडियावरुन शिल्पालाही मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यावर तिनं नेटकऱ्यांची माफीही मागितली होती. एवढेच काय दरवेळी मला ट्रोल करण्यापेक्षा ज्यानं चूक केली आहे त्यालाच का बोलत नाही अशा भाषेत शिल्पानं नेटकऱ्यांनी उत्तर दिले होते. शिल्पा आणि राज हे फार कमी वेळा एकत्रितपणे फिरताना दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी एका युझर्सनं राजला ट्विटमधून खोचक प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुन संतापलेल्या राजनं देखील त्याला जशास तसे उत्तर दिले आहे.

त्या युझर्सनं असं म्हटलं आहे की, अरे राज तुला तर तुझ्या बायकोमुळे किंमत आहे. नाहीतर तुला कोण विचारतो....यापूर्वी देखील राजवर जेव्हा पॉर्नोग्राफी केसमध्ये वेगवेगळे आरोप झाले होते तेव्हा अभिनेत्री पुनम पांडे, शर्लिन चोप्रा यांनी राजवर भयानक आरोप करुन शिल्पाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. राज सध्या जिकडे जातो तेव्हा तो मास्क लावून उभा असतो अशावेळी त्या नेटकऱ्यानं राजचा चांगलाच समाचार घेतला आहे.

तू जर काही केलं नाहीस तर मास्क लावण्याची गरज काय अशा आशयाच्या प्रतिक्रिया त्याला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. शिल्पाचा पती असल्यानं तुझी लोकप्रियता आहे. अन्यथा काही नाही. मी जर शिल्पाचा पती नसतो तर माझ्यातही कुणी रस घेतला नसता अशा शब्दांत राजनं उत्तर दिलं आहे. जे आता सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT