Shilpa Shetty recalls when her mom called her 'nikammi'  Google
मनोरंजन

'ते खूपच लाजिरवाणं होतं...' शिल्पा शेट्टीनं सांगितला इयत्ता दहावीतला अनुभव

शिल्पा शेट्टी सध्या तिच्या 'निकम्मा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलतीच बिझी आहे.

प्रणाली मोरे

शिल्पा शेट्टींन(Shilpa Shetty) आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये आपलं चांगलं नाव कमावलं आहे. अगदी थेट हॉलीवूड(Hollywood) पर्यंत ती आपल्या विजयाचा झेंडा रोवून आलीय. आज तिला ओळखत नाही असं फारसं कुणी सापडणार नाही. सध्या शिल्पा आपल्या 'निकम्मा'(Nikamma) सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बिझी आहे. याच दरम्यान एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीच्या निमित्तानं शिल्पानं सिनेमाच्या 'निकम्मा' टायटलविषयीच्या आपल्या काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. चला जाणून घेऊया नेमकं काय कनेक्शन आहे शिल्पा आणि निकम्मा टायटलचं. (Shilpa Shetty recalls when her mom called her 'nikammi')

शिल्पानं आपल्या त्या मुलाखतीत आपल्या सिने-करिअर संदर्भातले काही किस्से शेअर केले आहेत. ती म्हणाली की,''एक वेळ होती जेव्हा माझे पालक मला 'निकम्मी' म्हणून संबोधायचे. यामागचं कारण सांगताना शिल्पा म्हणाली,''ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा एसएससी परिक्षेआधी शाळेत प्रीलियम परिक्षा होते, त्याचे माझे रिपोर्ट्स आले होते. आणि मला त्यात फक्त ४८ टक्के मिळाले होते. आणि खरंच ते खूप लाजिरवाणं होतं''.

आपल्या दहावीतल्या त्या कमी मार्क्सविषयी खंत व्यक्त करताना शिल्पा म्हणाली,''ती व्हॉलीबॉल चॅम्पियन होती. आणि तिला त्यामध्येच आपलं करिअर करायचं होतं. मुलगी व्हॉलीबॉलमध्ये चॅम्पियन आहे,तिथे तिचं चांगलं करिअर होईल याची कल्पना असताना देखील शिल्पाची आई मात्र दहावीतल्या प्रीलियम परिक्षेतील मार्क्स पाहून नाराज झाली होती. खरंतर तेव्हा चांगले गुण मिळवण्यासाठी शिल्पानं खूप अभ्यास केला होता. पण त्याचं रुपांतर मार्क्स् मध्ये झालं नाही. आणि मग त्या पूर्ण काळात आई तिला 'निकम्मी' बोलायला लागली''. तसं आज पाहिलं तर शिल्पानं अभिनयात यश मिळवून आपण 'निकम्मी' नाही हे सिद्ध केलं.

शिल्पा शेट्टीनं मुलाखतीत सिनेमात काम करण्याचा आपला अनुभव देखील सांगितला. तिनं आपल्या 'निकम्मा' सिनेमाला एक आनंद देणारा,हलक्या-फुलक्या कथानकाचा सिनेमा म्हटलं आहे. 'निकम्मा' सिनेमाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी बॉलीवूडमध्ये कमबॅक करीत आहे. तसं पाहिलं तर शिल्पानं 'हंगामा २' मधून ओटीटीवर म्हणजे डिजिटल माध्यमात पदार्पण केव्हाच केलं आहे. मग तर 'हंगामा २' तिचा कमबॅक सिनेमा आहे असं म्हणता येईल. शिल्पा रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' सिनेमाचा देखील भाग आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा,विवेक ओबेरॉय देखील शिल्पासोबत दिसणार आहेत.

'निकम्मा' सिनेमाचं दिग्दर्शन शब्बीर खाननं केलं आहे. या सिनेमात शिल्पा व्यतिरिक्त अभिमन्यु दसानी,शर्ली सेतिया मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा MCA-Middle Class Abbayi या तेलुगु सिनेमाचा रीमेक आहे. हा सिनेमा १७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT