Shilpa Shetty role in baazigar was offered to another actor Esakal
मनोरंजन

Baazigar सिनेमात शिल्पा शेट्टी नव्हतीच मुळी मेकर्सची पसंती.. 'या' अभिनेत्रीला आधी भूमिका झाली होती ऑफर

'बाजीगर' सिनेमात भूमिका साकारल्यानंतर शिल्पा शेट्टीचं करिअर बॉलीवूडमध्ये धावू लागलं होतं.

प्रणाली मोरे

Baazigar: अजय देवगणचा सिनेमा 'फूल और कांटे' १९९१ साली प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमात त्याच्यासोबत मधु देखील होती. या सिनेमामुळे मधु रातोरात स्टार झाली होती. मधुला 'रोजा' सिनेमामुळे खूप प्रसिद्धी मिळाली होती. तिनं हिंदी सिनेमांसोबतच तामिळ,तेलुगु,कन्नड आणि मल्याळम सिनेमात काम केलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का मधूला 'बाजीगर' सिनेमा ऑफर झाला होता,ज्यासाठी तिनं नकार दिला होता.(Shilpa Shetty role in baazigar was offered to another actor)

शाहरुख खानचा 'बाजीगर' सिनेमा सुपरहिट ठरला होता. यामध्ये काजोल आणि शिल्पा शेट्टीनं काम केलं होतं. सिनेमाची गाणी,संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. या सिनेमात शिल्पा शेट्टीनं साकारलेली भूमिका आधी मधूला ऑफर केली गेली होती.

या गोष्टीचा खुलासा तिनं स्वतः केला होता. ईटाईम्सच्या एका रिपोर्टनुसार मधूनं 'बाजीगर' मधील भूमिकेला रिजेक्ट करावं लागलं असं म्हटलं होतं.

ती म्हणाली होती,''मला शिल्पाची भूमिका ऑफर झाली होती. पण मला त्या भूमिकेला नकार दिल्याचा मुळीच पश्चाताप नाही''.

हेही वाचा: Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

जेव्हा अभिनेत्री मधूला विचारलं गेलं होतं की, 'तिचा क्रश कोण?', तेव्हा ती म्हणाली होती,''जेव्हा क्रशचा मुद्दा येतो तेव्हा माझ्या ओठांवर शाहरुखचं नाव येतं. ज्या पद्धतीनं तो स्क्रीनवर काम करतो,स्वतःला प्रेझेंट करतो..ते सगळंच मला आकर्षित करतं. मी त्याची सगळ्यात मोठी चाहती आहे''.

'' मला वाटतं त्याचे सिनेमे भले फ्लॉप होऊ देत,त्याची भूमिका लोकांना आवडली नसेल तरीही तो देवासमान आहे त्याच्या अनेक चाहत्यांसाठी''.

मधुच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर तिनं व्यावसायिक आनंद शाह याच्याशी १९९९ मध्ये लग्न केलं होतं. तिला दोन मुली आहेत. याव्यतिरिक्त ती बॉलीवूड अभिनेत्री हेमामालिनीची भाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT