bollywood actress who love gardening shilpa shetty esakal
मनोरंजन

Bollywood actress Farming : एवढ्या मोठ्या अभिनेत्री पण, शेतीची आवड लय भारी! काहींनी तर टेरेसवर...

बॉलीवूडमधील कित्येक अभिनेत्री अशा आहेत की ज्यांना गार्डनिंग करण्याची खूप आवड आहे. त्यातील अनेक अभिनेत्रींनी तो तर आपला छंद झाल्याचे म्हटले आहे. अ

युगंधर ताजणे

bollywood actress who love gardening shilpa shetty anushka sharma : बॉलीवूडमधील कित्येक अभिनेत्री अशा आहेत की ज्यांना गार्डनिंग करण्याची खूप आवड आहे. त्यातील अनेक अभिनेत्रींनी तो तर आपला छंद झाल्याचे म्हटले आहे. अशातच काही अभिनेत्रींची नाव ही पुन्हा व्हायरल झाली आहेत. त्या अभिनेत्री त्यांच्या गार्डनिंग, पर्यावरणासाठी काम करताना जास्त सक्रिय असल्याचे दिसून आले आहे.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माला देखील टेरेस फार्मिंगची खूप आवड आहे.तिनं तिच्या घराच्या टेरेसवर तो प्रयोग केला आहे. त्याला यापूर्वी नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनुष्कानं त्याचे काही फोटोही शेयर केले आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या त्या अभिनव प्रयोगशीलतेचे कौतूक केले आहे. लॉकडाऊनच्यावेळी तिनं तर आपल्या टेरेस शेतीचे शेयर केलेले फोटो खूप व्हायरल झाले होते. अनुष्काच्या त्या इनडोअर गार्डनला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

Anushka Sharma

जूही चावला

जुहीला देखील बागकामाची खूपच आवड आहे. दिवसभरातील कित्येक वेळ ती बाकीच्या कामांमध्ये व्यस्त असेल मात्र थोडा वेळ का होईना ती बागकामासाठी ती देते. त्याचे काही पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जुहीनं तिच्या परसदारात टोमॅटो, कोथंबिर, मेथी सारख्या भाज्यांचे फोटो शेयर केले आहेत. तिलाही शेतीची खूप आवड आहे. जुहीचे पर्यावरणावरील प्रेम हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. तिनं गेल्यावर्षी एका बड्या कंपनीच्या विरोधात कोर्टामध्ये पर्यावरणाच्या प्रश्नावर धाव घेतली होती.

Juhi Chawala

प्रीति जिंटा

प्रीतिविषयी जितकं बोलावं तेवढं कमी आहे. ती नेहमीच पार्टी गर्ल म्हणून समोर आली आहे. मात्र आवडीनं गार्डनिंग करणारी अभिनेत्री म्हणूनही तिचे नाव घेतले जाते. काही दिवसांपूर्वी या लोकप्रिय अभिनेत्रीनं त्याबाबत काही फोटोही शेयर केले होते. त्याला मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांचा, चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. प्रीती ही भलेही परदेशात राहत असेल मात्र तिनं तिची गार्डनिंगची आवड त्या देशातही जपली आहे.

Preety zinta

शिल्पा शेट्टी

बॉलीवूडची फिटनेस फ्रीक सेलिब्रेटी म्हणून शिल्पाकडे पाहिले जाते. सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटींपैकी एक असा शिल्पाच्या नावाचा गवगवा आहे.ती स्वत एक ब्रँड आहे. योगागुरु म्हणून आपल्या नावाची वेगळी ओळख तिनं निर्माण केली आहे. शिल्पाचे घर आणि त्याच्या इंटेरिअरचे फोटो कित्येकदा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले आहे. शिल्पानं देखील किचन गार्डन सुरु केले असून त्यामध्ये तिनं लिंबाच्या झाडाचा फोटो शेयर केला होता.

ट्विंकल खन्ना

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्नानं देखील तिची फार्मिंगची आवड गेल्या कित्येक दिवसांपासून जोपासली आहे. ट्विंकल ही आता एक चांगली लेखकही झाली आहे. वेगवेगळ्या मासिकांमध्ये ती लिहित असते. त्याला मिळणारा वाचकवर्गही मोठा आहे. ट्विंकल ही तिचा बराचसा वेळ त्या गार्डनमध्ये व्यत्तीत करते. तिनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेयर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT