shilpa shinde slams Hindi reality show jhalak dikhhla jaa 10 judges karan johar madhuri nora in supports nia sharma
shilpa shinde slams Hindi reality show jhalak dikhhla jaa 10 judges karan johar madhuri nora in supports nia sharma  
मनोरंजन

Video : तुम्ही काय 'ऑस्कर' देणार का? 'झलक दिखला जा'वरून करण जोहरवर भडकली शिल्पा

सकाळ डिजिटल टीम

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) तिच्या बिंदास वक्तव्यांसाठी ओळखली जाते, ती नेहमीत तीचं म्हणणं मोकळेपणाणे मांडत आली आहे. दरम्यान झलक दिखला जा (Jhalak Dikhla Jaa 10) या डान्स रियालिटी शोमधून शिल्पाला बाहेर पडली आहे. या डान्स रिअॅलिटी शोमधून बाहेर आल्यानंतर शिल्पा शिंदे कार्यक्रमाच्या परीक्षकांवर चांगलीच संतापली आहे. शिल्पाने खासकरून करण जोहरवर निशाणा साधला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊया.

शिल्पा शिंदे करण जोहरवर चिडली

शिल्पा शिंदेने झलक दिखला जा च्या परीक्षकांची एकप्रकारे खिल्ली उडवली आहे. इन्स्टावर व्हिडिओ शेअर करताना शिल्पाने डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षकांनी स्पर्धकांच्या अॅक्ट्सचा आदर करण्यास आणि विचारपूर्वक कमेंट्स करण्यास सांगितले आहे. डांसनंतर परिक्षकांनी दिलेल्या कमेंट्सवर शिल्पाने आक्षेप घेतला आहे. शिल्पा म्हणते - हा व्हिडिओ माझ्या झलक दिखला जा पॅनलवर बसलेल्या जजेससाठी आहे. मी नियाचा शेवटचा परफॉर्मन्स पाहिला. त्याला दिलेल्या पॉइंट्स तसेच कमेंट ऐकून मी गप्प राहिले.

पण यावेळी परफॉर्मन्सनंतर जी कॉमेंट्स आली, त्यावरून मला विचारायचं आहे की, करण सर काय धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट देणार आहेत का? तीन मिनिटांच्या परफॉर्मन्समध्ये तुम्हाला डान्स दिसला नाही. तुम्हाला डांन्स देखील हवा आहे, मनोरंजन देखील हवे आहे, काहीतरी वेगळे हवे आहे. हा एक डान्स शो आहे, तुम्हाला सेलिब्रिटी स्पर्धक हवे आहेत, तुम्हाला काय हवे आहे, तुम्ही त्यांना ऑस्कर किंवा राष्ट्रीय पुरस्कार देणार आहात का? असेही शिल्पाने सुनावले आहे.

शिल्पाने पुढे म्हटले की, तीन मिनिटांच्या सादरीकरणासाठी कलाकार काय करतो तुम्हालाही माहीत आहे. स्पर्धा नाही असं बोलता, तरी देखील आहे. रुबीनाचा व्हिडिओ काढा आणि बघा, तिच्यासोबत कोणताही अपघात होऊ शकतो. काही झाले तर त्याला जबाबदार कोण? परिक्षक जबाबदार असतील का? नंतर मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरण्याचा उपयोग नाही. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याचा आदर करा. नंतर भुंकू नका. करमणूकीचा शो आहे करमणूक करा. चाहते आपापसात भांडत आहेत. आपण कशासाठी भांडतोय हेच माहित नाही.

तुम्हाला आवडणाऱ्या कलाकाराचा आदर करा. उठून निरर्थक बोलायला काय लागतं? आम्ही पाणी पिऊ शकत नाही. बाथरूममध्ये जाता येत नाही, इतकी स्थिती बिघडते. हा 3 मिनिटांचा अॅक्ट नाही, त्यामागे खूप मेहनत आहे. मी तर आजारी पडले होते. हात जोडून मी परिक्षकांना विनंती करते की त्यांनी अॅक्टचा आदर करावा. तसे कमेंट करा कारण त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

नियाच्या परफॉर्मंस नंतर परीक्षक काय म्हणाले होते?

दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये निया शर्मा आई कालीची वेशभूषा केली होत . नियाने डान्स अॅक्टमध्ये राक्षसाचा वध केला. नियाचे दमदार डान्स गेस्ट अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांना खूप आवडला. माधुरीने नियाला 8 नंबर दिले आणि तिला जोशात संयम न सोडण्याचा सल्ला दिला. करण जोहरला नियाचा अॅक्ट आवडला नाही. त्यांच्या मते डान्सचा अभाव होता. तो म्हणाला- आम्हाला डान्स हवा आहे, आम्हाला डान्स दाखवा. नोरा फतेहीने नियाला स्टेबिलीटवर काम करण्यास सांगितले होते. करण जोहर आणि नोरा फतेही यांनीही नियाला 8 गुण दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT