Bigg Boss 16 Finale Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16 Finale: 'राजा माणुस हा दिलदार', शिवचं बिग बॉसकडून तोंड भरुन कौतुक

सकाळ डिजिटल टीम

आज बिग बॉस 16 चा शेवटचा शुक्रवारचा एपिसोड आहे आणि हा दिवस खूप खास असणार आहे. कारण घरच्यांना आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये शालीन भानोत आणि प्रियंका चहर चौधरी यांचा प्रवास दाखवण्यात आला होता आता आज उरलेल्या स्पर्धकांचा प्रवास दाखवला जात आहे. ज्यात बिग बॉसने शिव ठाकरेचा प्रवास दाखवला जो सर्वांनाच खुप आवडणारा होता.

बिग बॉस 16 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये बिग बॉसने पहिल्यांदा शिव ठाकरे यांचा प्रवास दाखवला. घरातील बलाढ्य खेळाडूंमध्ये शिव ठाकरेंचे नाव घेतले जाते. खुद्द सलमान खानच नव्हे तर बिग बॉसने देखील शिवाच्या खेळाचं कौतुक केलं आहे. शिवचं कौतक करताना बिग बॉसने त्याला साष्टांग नमस्कारच केला.

बिग बॉसने शिवाला सांगितलं की, शिव हा बिग बॉसच्या इतिहासातील एकमेव खेळाडू आहे ज्याला एक नव्हे तर दोन बिग बॉस फिनालेचा ताज मिळवला आहे. तो या सिझनचा टाक्स किंगही म्हंटलं. एवढंच नाही तर, शिव हा मंडलीचा जीव आहे याठिकाणी बरीच सदस्य होती पण त्यांना चालवणारा शिव ठाकरे होता.

मराठा ऐकल्यावर त्यांची वीरता आठवते. वीर मराठ्यांप्रमाणे शिव कोणालाही घाबरला. तो बरोबर एका चौकटीत खेळला. हे सगळं ऐकुन तो भावूक होतो. साजिद खानने घर सोडण्यापूर्वी या मंडलीची काळजी घेण्यास सांगितले होते यावरून हे सिद्ध होते.

त्यांनतर बिग बॉस मराठीत म्हणतो, 'आई शपथ ', हे ऐकताच शिव आणि त्याचे असलेले चाहते आनंदाने नाचू लागले. बिग बॉसकडून कौतुक ऐकून शिव म्हणतो 'बिग बॉस तू माझा गॉडफादर आहेस'

बिग बॉस 16 मधील शिव ठाकरेंचा अप्रतिम प्रवास पाहून घरात उपस्थित प्रेक्षकही नाचू लागतात. घरातील त्याचा अप्रतिम प्रवास पाहिल्यानंतर शिव म्हणतो, 'बिग बॉस तुम्ही तर चित्रपटच बनवला आणि मला त्यातला हिरो.' हा शो तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे शिव तुम्ही दाखवून दिलं आहेस. यानंतर बिग बॉस म्हणाले की, आज मी सुद्धा तुझ्यापुढे नतमस्तक होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

SCROLL FOR NEXT