Shiv Thakare Esakal
मनोरंजन

Shiv Thakare: 'दम हाय नावात वट हाय गावात'! शिव गावाला आला गावकऱ्यांना आनंद झाला..

सकाळ डिजिटल टीम

टिव्हि वरील सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस'चा 16वा सिझन नुकताच संपला. मात्र शो संपल्यानंतर चाहत्यांची निराशा झाली असली तरी ते आपल्या लाडक्या स्पर्धकाला फॉलो करत आहेत. अलीकडेच सर्व स्पर्धक फराहच्या घरी पार्टी करताना दिसले.

या पार्टीनंतर शिव ठाकरे त्याच्या गावी अमरावती येथे पोहोचला. मात्र तिथे त्याच्या चाहत्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शिव ठाकरेला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी रस्त्यावर जमली होती.

शिव ठाकरे 'बिग बॉस 16' चा उपविजेता ठरला. या शोची ट्रॉफी जरी त्याने जिंकली नसली तरी त्याने लोकांची मने मात्र नक्कीच जिंकली. त्याच्या चाहत्यांनी अजूनही हा निकाल मान्य केलेला नाही. त्यांच्यासाठी शिव ठाकरेच विजेता आहे.

शिव ठाकरे त्याच्या अमरावती येथील घरी पोहोचताच लोकांनी त्याचा रस्ता अडवला आणि फटाके वाजवून ढोलताशांच्या ताशाच्या गजरात त्याचं स्वागत केलं. यावेळी पब्लिक सैराट होत नाचली. सर्वांनीच शिव ठाकरेंच्या नावाचा जयघोष केला.

एवढं प्रेम आणि एवढं प्रेमळ स्वागत पाहून शिवचा आनंद हा गगनात मावेनासा झाला. त्यांने हात जोडून सर्वांचे आभार मानले. चाहत्यांच प्रेम पाहुन शिव खुप भावूक झालेला दिसला. शिव ठाकरेंच्या स्वागताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिव ठाकरे यांना 'बिग बॉस 16' मधील सर्वात मजबूत खेळाडू म्हटले जात होते. घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सेलिब्रेटीने शिवाच्या खेळ खेळण्याच्या रणनीतीची आणि त्याच्या प्रेमळ हृदयाची प्रशंसा केली. सलमाननेही अनेकवेळा शिवाचे कौतुक केले. शिव ठाकरेने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आणि करत राहणार यात वाद नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT