shiv thakare, veena jagtap, bigg boss 16 SAKAL
मनोरंजन

Shiv Thakare बिग बॉस जिंकला आणि Veena Jagtap चं 'ते' स्वप्न झालं पूर्ण..

शिव बिग बॉस १६ जिंकल्यानंतर वीणा जगतापचं सुद्धा एक अनोखं स्वप्न पूर्ण झालंय

Devendra Jadhav

Veena Jagtap News: शिव ठाकरेने बिग बॉस हिंदी १६ व्या सिझनचं विजेतेपद पटकावलं. शिवने त्याच्या उत्कृष्ट खेळाने बिग बॉस १६ च्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. शिव बिग बॉस १६ जिंकल्यानंतर वीणा जगतापचं सुद्धा एक अनोखं स्वप्न पूर्ण झालंय.

वीणा जगतापने सोशल मीडियावर एक लेटेस्ट फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पाहून वीणाच्या फॅन्सनी सोशल मीडियावर तिचं अभिनंदन केलंय.

(Shiv Thakare wins Bigg Boss and Veena Jagtap's 'that' dream comes true)

वीणा जगतापने नवी गाडी विकत घेतलीय. वीणाने सोशल मीडियावर नव्या गाडीचा फोटो पोस्ट करून सर्वांना हि खुशखबर दिली आहे. हि चेहऱ्यावरची स्माईल खूप छान आहे. माझी पहिलीवहिली गाडी.

या निमित्ताने माझ्या कुटुंबात एका नव्या सदस्याची भर पडली आहे. अशी पोस्ट करून वीणाने तिचा आनंद सर्वांसोबत शेयर केलाय. वीणाने संपूर्ण मेड इन इंडिया असलेली टाटा मोटर्सची नवीन कार विकत घेतलीय.

शिवने बिग बॉस १६ चं उपविजेतेपद पटकावलं. बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये सलमाननं एमसी स्टॅनच्या नावाची घोषणा केली आणि शिवचे डोळे भरुन आले.

विजेतेपद जाहीर करण्यापूर्वी.. निकाल काहीही असो जिंकणारा व्यक्ती हा मंडलीचा असणार आहे याचा दोघांना विशेष आनंद होता. शिवला बिग बॉस १६ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

बिग बॉस १६ च्या प्रवासात वीणाने शिवला कायम सपोर्ट केला आहे. एकदा कन्फेशन रूममध्ये शिव वीणाचा उल्लेख करून ढसाढसा रडला होता.

तेव्हा वीणाने "तू वाघ आहेस. मी आहे तुझ्यासोबत.. अजिबात रडू नकोस.." अशा शब्दात वीणाने शिवला सोशल मीडियाच्या माध्यमातून आधार दिला होता.

शिवने काहीच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिव आणि वीणा बिग बॉस नंतर एकमेकांना कधी भेटणार याची दोघांच्या फॅन्सना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुखापत झालेल्या शाहरुखला काही झालं तर इंडस्ट्रीसोबतच 'या' लोकांचंही दिवाळं निघेल; एकूण इन्व्हेस्टमेंट किती माहितेय?

Viral Video: शंभर रुपयात तीन पोरं, डील फिक्स! सायकल सोडून तिघांनी शेतात ठोकली धूम; व्हिडीओ तुफान व्हायरल

Latest Maharashtra News Updates : विधानभवनातील गोंधळावर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया : “मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत”

W,W,W,W,W! १७ वर्षीय फरहान अहमदची विक्रमी कामगिरी, हॅटट्रिकसह घेतल्या ५ विकेट्स

Crime: घोरपडीच्या गुप्तांगाची विक्री, ज्योतिषी अटकेत, नेमकं प्रकरण काय? घटना वाचून डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT