Shivani Rangole: गोड च बोला! शिवानी - विराजसची लग्नानंतरची पहिली संक्रांत SAKAL
मनोरंजन

Shivani Rangole: गोड च बोला! शिवानी - विराजसची लग्नानंतरची पहिली संक्रांत

शिवानी आणि विराजस यांनी लग्नानंतर पहिली संक्रांत साजरी केलीय.

Devendra Jadhav

आज मकरसंक्रांत! मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे. यातील एक जोडी म्हणजे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी. शिवानी आणि विराजस यांनी लग्नानंतर पहिली संक्रांत साजरी केलीय. शिवानीने सोशल मीडियावर विराजस सोबतचे खास फोटो पोस्ट करत रोमँटिक पोझ दिली आहे.

(shivani rangole virajas kulkarni celebrate their first makarsankranti after their wedding )

हे खास फोटो पोस्ट करून शिवानी लिहिते, "मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा! गोड च बोला!" शिवानी आणि विराजसच्या फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. शिवानीने काळी साडी नेसून हलव्याचे दागिने परिधान केले आहेत. तर विराजसने सुद्धा काळा कुर्ता घालून शिवानी सोबत रोमँटिक पोझ देत फोटोशूट केलंय.

हे खास फोटो पोस्ट करून शिवानी लिहिते, "मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा! गोड च बोला!" शिवानी आणि विराजसच्या फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. शिवानीने काळी साडी नेसून हलव्याचे दागिने परिधान केले आहेत. तर विराजसने सुद्धा काळा कुर्ता घालून शिवानी सोबत रोमँटिक पोझ देत फोटोशूट केलंय.

२०२० मध्ये व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी शिवानीने 'Yup 'असं कॅप्शन देत विराजस सोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. आणि तेव्हापासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पुढे विराजस आणि शिवानी यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधली. या दोघांचा हा लग्नसोहळा पुण्यात पार पडला.

शिवानी आणि विराजस यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली. ‘डावीकडून चौथी बिल्डींग’ या विराजसच्या प्रायोगिक नाटकात शिवानीने काम केलं होतं. शिवानीने अनेक सिनेमे, नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तर विराजसने सुद्धा मराठी सिनेमे, नाटक आणि 'माझा होशील ना' मालिकेत काम केलंय. दोघांनी एकमेकांच्या करिअरला कायम सपोर्ट केलाय.

नुकतंच विराजसने दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा 'व्हिक्टोरिया' १३ जानेवारीला रिलीज झालाय. सिनेमात सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, पुष्कर जोग अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.प्रेक्षक आणि समीक्षकांनी व्हिक्टोरिया संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असून बॉक्स ऑफिसवर सिनेमा चांगली कामगिरी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT