Shraddha Kapoor Viral Video esakal
मनोरंजन

Shraddha Kapoor Viral Video : 'मला पण थोडा पिझ्झा मिळेल का?' श्रद्धानं चक्क पापाराझ्झीकडेच मागितला पिझ्झा!

प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor Viral Video) ही आता त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Shraddha Kapoor Bollywood Actress Viral Video : प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांची लाडकी लेक श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor News) ही आता बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीतही ती अग्रेसर आहे. (Viral Video News) सध्या श्रद्धा ही तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. त्या व्हिडिओनं चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

सौंदर्य आणि उत्तम अभिनय यांच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची (Latest Bollywood News) ओळख तयार करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये श्रद्धा कपूरचेही नाव घेतले जाते. काही वर्षांपासून ती वेगवेगळ्या गोष्टींमुळे चाहत्यांच्या कमेंट्सचा विषय राहिली आहे. श्रद्धा ही बऱ्याचदा तिच्या गमतीशीर (Shraddha Viral Video) व्हिडिओ शेयर करण्याच्या सवयीमुळे देखील अनेकदा सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय असते.

आता ती एका पापाराझ्झीकडे पिझ्झा मागतानाचा व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हि़डिओनं (Bollywood Celebrity News) नेटकऱ्यांच्या कमेंट्सला उधाण आले आहे. त्याचं झालं असं की, श्रद्धानं सोमवारी एका पुरस्कार सोहळ्यात सहभाग घेतला होता. त्यावेळी तिथं ती प्रमुख पाहुणी म्हणून गेली होती. पिंक कलरच्या ड्रेसमधील श्रद्धाचा लूक भलताच खास होता.

त्या सोहळ्यात गेल्यानंतर श्रद्धानं फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिली. (Shraddha Kapoor Pizza Party) त्याचवेळी तिची नजर मीडियातील काही फोटोग्राफर्सकडे गेली. त्यांची पिझ्झा पार्टी सुरु होती. तिनं ते पाहताच त्यांच्याकडे जात पिझ्झा खाण्याचा आनंद लुटल्याचे दिसून आले. श्रद्धाच्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. त्यात काहींनी तिला भूक अनावर झाल्यानं पापाराझ्झींच्या पिझ्झा पार्टीवर धाड टाकली. असे म्हटले आहे.

श्रद्धा पापाराझ्झींकडे गेल्यानंतर त्यांनी देखील तिला पिझ्झा खाण्याची ऑफर दिली. त्यावेळी श्रद्धानंही विनंतीला मान देत पिझ्झा खाण्याचा आनंद घेतला. नेटकऱ्यांना श्रद्धाचा तो मनमिळावू अंदाज आवडल्याचे दिसून आले आहे. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियातून तिचे कौतुक केले आहे.

श्रद्धाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिचा स्त्री २ नावाचा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय आणखी २ चित्रपटही तिच्या प्रोजेक्ट लिस्टमध्ये आहेत. त्यात एका चित्रपटामध्ये मायथॉलॉजिकल ड्रामा तर दुसऱ्यामध्ये टाईम ट्रॅव्हल विषयावर आधारित भूमिकेत ती दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT