Shraddha Kapoor Bought Lamborghini Esakal
मनोरंजन

Shraddha Kapoor: दसऱ्याला श्रद्धानं दिलं स्वत:लाच गिफ्ट! घरी आणली 'लॅम्बोर्गिनी'! किंमत ऐकून बसेल धक्का...

Shraddha Kapoor Bought Lamborghini: यंदाच्या दसऱ्याच्या खास मुहूर्तावर श्रद्धा कपूरने आता एक नवीन आलिशान कार घरी आणली आहे.

Vaishali Patil

Shraddha Kapoor Bought Lamborghini: नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहात साजरा केल्यानंतर सर्वांनी काल उत्साहात दसरा साजरा केला. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण साजरा करताना अनेक नवनवीन वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. तर बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने देखील यंदाच्या दसऱ्याच्या खास मुहूर्तावर एक नवीन महागडी वस्तू खरेदी केली आहे.

दसऱ्याच्या खास मुहूर्तावर श्रद्धा कपूरने आता एक नवीन आलिशान कार घरी आणली आहे. श्रद्धाने तिच्या नवीन कारसोबतचे फोटो शेयर करुन चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.

कार शोरूम ऑटोमोबिली आर्डेंट इंडियाने एका पोस्टद्वारे श्रद्धाने नवीन लॅम्बोर्गिनी खरेदी केल्याची पोस्ट शेयर केली आहे. त्याचबरोबर श्रद्धाचे तिच्या नवीन कारसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

शोरूमने नवीन लॅम्बोर्गिनीसोबत श्रद्धाचे फोटो पोस्ट केले आहे आणि त्यावर लिहिले की, 'कोणताही वेगळा मार्ग नाही, श्रद्धा कपूरने नुकतीच हुराकन टेक्निका खरेदी केली आहे! ती कदाचित बॉलीवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री नसावी पण श्रद्धा कपूर ही त्या कलाकारांपैकी एक आहे आता तिला ही Rosso Anteros Lamborghini Huracan Tecnica घरी नेताना पाहून तिला खूप छान वाटले आहे.'

यावेळी श्रद्धा कपूर पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड सूटमध्ये दिसत आहे. ती खूप सुंदर दिसत आहे. ती तिच्या नवीन लाल रंगाची लॅम्बोर्गिनी कारसोबत पोज देताना दिसली. या कारची किंमत 4.04 कोटी रुपये आहे.

मिडिया रिपोर्टनुसार याआधी श्रद्धाने BMW 7 सीरीज खरेदी केली होती ज्याची किंमत 2.46 कोटी रुपये होती. त्याचबरोबर तिच्याकडे मर्सिडीज बेंझ जीएलई कार होती ज्याची किंमत 1.01 कोटी रुपये होती. आता श्रद्धा कपूर लॅम्बोर्गिनी हुराकन टेक्निकाची मालकिण झाली आहे.

श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'तू झुठी मैं मक्कार'मध्ये दिसली होती. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धाने रणबीरसोबत स्क्रिन शेयर केली होती. आता श्रद्धा हॉरर-ड्रामा चित्रपट स्त्री 2 मध्ये राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT