shradhha kapoor  google
मनोरंजन

श्रद्धा कपूरने दोनच शब्दात केले गार...

श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्या ब्रेकअप बाबतच्या चर्चांना उधाण आलेले असताना श्रद्धा कपूरने समाज माध्यमांवर येऊन दोनच शब्दात अनेकांची बोलती बंद केली आहे.

नीलेश अडसूळ

ENTERTAINMENT NEWS : बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मनाली जाणारी श्रद्धा कपूर (shraddha kapoor) चाहत्यांसाठी कायमच खास राहिली आहे. समाज माध्यमांवर अनेकदा तिचे कौतुक होताना दिसते. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्स वर ती कायम आपल्या जीवनातील घडामोडी शेअर करत असते. अशातच श्रद्धा कपूरची डोकेदुखी वाढवणाऱ्या बातम्या कानी येऊ लागल्याने ती उपरोधाने सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे.

श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांचे ब्रेकअप झाले असल्याच्या चर्चांना उधाण आल्याने मोठी खळबळ उडाली. समाज माध्यमावर याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. अखेर श्रद्धा कपूरने अप्रत्यक्षरित्या त्यावर प्रतिक्रिया देऊन अनेकांना सडेतोड उत्तर दिले आहे.

shraddha kapoor and rohan shreshtha

श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ हे गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये आहेत. अशातच त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली. त्यांच्या एकूण वागण्याचा अंदाज लावून चाहत्यांनी त्यांचा ब्रेकअप झाल्याचा निष्कर्ष काढला. ही बातमी ऐकल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. मात्र याचे उत्तर देणारी एक पोस्ट श्रद्धाने लिहिली आहे.

श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत तिने स्वतःचा एक सुंदर आणि हसरा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. 'और सुनाओ...' असे ती यात म्हणते. म्हणजे सगळं काही झालं असेल तर अजून सांगा... अशा उपरोधिक शैलीत ती व्यक्त झाली आहे. तिच्या या पोस्टमुळे ब्रेकअप झाल्याचे सांगणाऱ्या सर्वांच्या तोंडाला टाळे लागले आहे. बोलती बंद झाली आहे. श्रद्धाच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करताना दिसत असून डान्स मास्टर रेमो डिसूझानेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

श्रद्धा कपूर लवकरच निर्माता-दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झाले नसले तरी या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबत ती लवकरच ‘चालबाज इन लंडन’ आणि विशाल फुरियाच्या ‘पाइपलाइन’ या चित्रपटातही झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

Sand Mafia Caught : महसूल विभागाचा वाळू माफीयांना दणका : संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उडवल्या!

'लागली पैज?' नाटक येतंय प्रेक्षकांच्या भेटीला; 'शुभविवाह' फेम अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका; रुमानी खरेचं रंगभूमीवर पदार्पण

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

SCROLL FOR NEXT