Shreyas Talpade  Esakal
मनोरंजन

Shreyas Talpade: श्रेयस तळपदेच नव्हे तर 'या' सेलिब्रिटींनाही आलाय या वयात हृदयविकाराचा झटका! सुष्मिता अन् सैफचाही आहे यादीत सामावेश

Actors Who Suffers Heart Attack: केवळ अभिनेता श्रेयस तळपदे नाही तर असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना काम करताना किंवा काम संपल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला आहे.

Vaishali Patil

Actors Who Suffers Heart Attack: अलीकडेच मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला नुकताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तो अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत होता.

शूटिंग संपल्यानंतर घरी पोहोचल्यावर तो अचानक बेशुद्ध झाला. त्याला तातडीने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थीर आहे. तो 47 वर्षाचा आहे.

मात्र ही बातमी समोर येताच चाहत्यांना धक्का बसला होता. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहे. मात्र पण तुम्हाला माहित आहे का, की केवळ अभिनेता श्रेयस तळपदे नाही तर असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना काम करताना किंवा काम संपल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला आहे.

यात अनेक कलकारांचा जीव वाचला मात्र काहींनी ही लढाई हरली. आता या यादित कुणाचा सामावेश आहे यावर एक नजर टाकूया.

सुष्मिता सेन

या यादित पहिलं नाव येत ते सुष्मिता सेनचे. तिलाही या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. तिची वयाच्या 47 व्या वर्षी अँजिओप्लास्टी झाली. सुष्मिताने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली होती. तिच्या हृदयाकडे 95% ब्लॉकेज होते. मात्र, सुष्मिता सेनने ही लढाई जिंकली आणि ती आता बरी आहे

सुनील ग्रोव्हर

सुनील ग्रोव्हरला वयाच्या 45 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्याच्यावर उपचार करत बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. बराच वेळ विश्रांती घेतल्यानंतर सुनील ग्रोव्हर कामावर परतला. आता तो फिट आहे.

सैफ अली खान

सैफ अली खान देखील या यादित येतो. सैफ अली खानला 2007 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची ईसीजी करावी लागली होती. वयाच्या 36 व्या वर्षी त्याला सैफ अली खानला जेव्हा हृदयविकाराचा झटका आला होता.

रेमो डिसोझा

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा याला देखील वयाच्या 45 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला. 2020 मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर रेमोची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

केके (कृष्णकुमार कुननाथ)

प्रसिद्ध बॉलीवूड गायक केके यांना कोलकाता येथे त्यांच्या एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना अचानक छातीत दुखू लागले. त्यावेळी तातडीने केकेला रुग्णालयात नेण्यात आले. वयाच्या 53 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटका आला होता आणि त्यातच त्यांचे निधन झाले. ही बातमी चाहत्यांसाठी खुपच धक्कादायक होती.

रीमा लागू

रीमा लागू यांचा देखील या यादित सामावेश आहे. स्टारप्लसच्या शो 'नामकरण' शोच्या काही तासांच्या शूटिंगनंतर रात्री उशिरा त्यांच्या छातीत दुखू लागले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT