Shreyas Talpade to play Atal Bihari Vajpayee in Kangana Ranaut’s Emergency sakal
मनोरंजन

Emergency movie : श्रेयस तळपदे साकारणार 'अटल बिहारी वाजपेयी'

अभिनेत्री कंगना रणौतच्या आगामी 'एमरजन्सी' या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहे.

नीलेश अडसूळ

emergency : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या आगामी 'एमरजन्सी' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, कायमच कॉँग्रेसला धारेवर धरणारी कंगना या चित्रपटात चक्क भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकरणार आहे. 'आणीबाणी' या देशातील सर्वात मोठी राजकीय घटना मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटात कंगना केवळ अभिनयच नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शन ही करणार आहे. या चित्रपटातबाबत एक मोठी घोषणा नुकतीच करण्यात आली.

(Shreyas Talpade to play Atal Bihari Vajpayee in Kangana Ranaut’s Emergency)

कंगना राणौत इंदिरा गांधी यांची भूमिका साकरणार असल्याचे जाहीर झाले आणि तिचा पहिला लुक समोर आला. या लूकला चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद दिला, त्यांनंतर काही दिवसातच अभिनेता अनुपम खेर यांचा लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता दिवंगत राजकारणी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. आता भाजपनेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण साकरणार हे समोर आहे. ही भूमिका मराठी अभिनेता श्रेयस तळपदे साकरणार आहे.

याबाबत कंगनाने एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्ट मध्ये श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या पोस्टला कंगनाने 'एक सच्चा राष्ट्रवादी.. ज्यांचे देशावर अमाप प्रेम आणि अभिमान अतुलनीय होता. आणीबाणीच्या काळात घडलेला एक तरुण नेता..' असे कॅप्शन दिले आहे.

तर अभिनेता श्रेयस तळपदे यानेही हि पोस्ट शेअर केली आहे. 'बाधाएं आती हैं आएं.. घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा।' अशी अटल बिहारी वाजपेयी यांची कविता त्याने शेअर केली आहे. शिवाय तो म्हणतो, 'एका खऱ्या राष्ट्रभक्ताची, व्यापक दृष्टिकोन असणाऱ्या भारतरत्न 'अटल बिहारी वाजपेयी' यांची भूमिका करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मला आशा आहे कि तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन.' असेही तो म्हणाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT