Shweta Bachchan  esakal
मनोरंजन

Shweta Bachchan : अमिताभ यांच्या मुलीचं बॉलीवूडच्या 'त्या' अभिनेत्यावर होतं क्रश! म्हणून ती नेहमीच...

श्वेतानं कधीही बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचे कारण तिनं करणच्या शोमध्ये सांगितले होते.

सकाळ डिजिटल टीम

Shweta Bachchan Birthday Amitabh Bachchan Daughter : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची गोष्टच वेगळी आहे. वयाची ८० वर्षे पुर्ण केल्यानंतरही त्यांच्यात असणारा उत्साह हा तरुण अभिनेत्यांना अवाक् करणारा असतो. बिग बी हे नेहमीच कार्यरत असणारे अभिनेते आहे.भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांमध्ये त्यांचे नाव आदरानं घेतले जाते.

अमिताभ सोशल मीडियावरही नेहमीच अॅक्टिव्ह असतात. त्यावर आपल्या कुटूंबातील वेगवेगळे फोटोज आणि व्हिडिओ ते शेयर करत असतात. आज त्यांच्या लाडक्या लेकीचा श्वेता बच्चनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं सोशल मीडियावर तिच्याविषयीच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्यात एका पोस्टकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. श्वेता बच्चन आणि तिचं बॉलीवूडमधील क्रश. खरं तर तिनचं बॉलीवूडमध्ये आपल्या आवडत्या अभिनेत्याविषयी सांगितलं होतं.

Also Read - ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

बॉलीवूडचे शहेशहा अमिताभ बच्चन यांची लाडकी लेक श्वेता बच्चनचा आज ३९ वा जन्मदिवस आहे. श्वेतानं कधीही बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचे कारण तिनं करणच्या शोमध्ये सांगितले होते. श्वेता भलेही अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध नसली तरी तिनं एक स्तंभलेखिका म्हणून लोकप्रियता मिळवली आहे.सोशल मीडियावरही तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

चित्रपटांपासून का लांब गेली....

श्वेतानं एका लेखामध्ये या गोष्टीविषयी सांगितलं होतं. शाळेत असताना तिनं एका नाटकामध्ये भाग घेतला होता. त्यात तिनं एका वैमानिकाची भूमिका केली होती. मात्र क्लायमॅक्सच्यावेळी ती तिची भूमिका विसरुनच गेली. त्यानंतर तिला पुन्हा अभिनय करण्याची फारच भीती वाटू लागली. यामुळेच की काय श्वेता पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात कधीच दिसली नाही. तिचा बॉलीवूडचा प्रवास सुरु होण्याआधीच संपला.

कुणावर होतं श्वेताचं क्रश....

श्वेता जेव्हा कॉफी विथ करणमध्ये आली होती तेव्हा तिनं बऱ्याचशा गोष्टींबाबत धक्कादायक खुलासे केले होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. करणनं तिला बोलतं केलं आणि श्वेतानं तिचे बरेचसे सिक्रेट यावेळी शेयर केले होते. करणनं विचारलं तुझा क्रश कोण होता....त्यावेळी तिनं जराही वेळ न लावता बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे नाव घेतले. अभिषेक माझ्यासाठी सलमानची ती टोपी देखील घेऊन आला होता जी मैंने प्यार किया मध्ये होती.

सलमानची मी खूप चाहती होते. त्याच्या मैंने प्यार किया या चित्रपटातील आवाज मी नेहमीच ऐकत असे. ती टोपी देखील झोपताना जवळ ठेवत असे. त्या माझ्या खूप गोड आठवणी आहेत. त्याचा तो मैने प्यार किया नावाचा चित्रपट मला खूपच आवडला होता. असेही श्वेतानं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT