Shweta Tiwari Latest News Shweta Tiwari Latest News
मनोरंजन

Shweta Tiwari : श्वेता तिवारीने आपल्या मुलीला दिला लग्न न करण्याचा सल्ला

प्रत्येक लग्न वाईट नसते

सकाळ डिजिटल टीम

Shweta Tiwari Latest News ‘मेरे डॅड की दुल्हन’ या टीव्ही शोमध्ये अखेरची दिसलेली अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. दरम्यान, ती रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. आता ती ‘मैं हूँ अपराजिता’ या टीव्ही शो सह परत येणार आहे. शो बद्दल बोलताना तिने आपल्या मुलीला लग्न (Marriage) न करण्याचा सल्ला दिला आहे.

श्वेता तिवारी प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्वेताने लग्नाबद्दल काय विचार आहे याबद्दल स्पष्टच सांगितले. ‘माझा विवाहावर (Marriage) विश्वास नाही. मी माझ्या मुलीलाही लग्न करू नकोस असे सांगतो’ अशी श्वेता म्हणाली.

‘हे तिचे आयुष्य आहे. ते कसे जगायचे हे मी तिला सांगत नाही. परंतु, कोणतीही नवीन झेप घेण्यापूर्वी त्यांनी विचार करावा असे मला वाटते. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहे म्हणून त्याचे रूपांतर लग्नात करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात लग्न होणे खूप महत्त्वाचे आहे. लग्नाशिवाय आयुष्य कसे जाईल, असे होऊ नये’ अशी श्वेता तिवारी (Shweta Tiwari) म्हणाली.

प्रत्येक लग्न वाईट नसते. माझे अनेक मित्र आहेत जे लग्न करून आनंदी आहेत. मी त्यांच्यासाठी आनंदी आहे. परंतु, मी माझ्या अनेक मैत्रिणींनाही लग्न तोडताना पाहिले आहे. ते त्यांच्यासाठी आणि मुलांसाठी चांगले नाही. म्हणूनच मी माझ्या मुलीला समजावून सांगतो की, तिला जे आनंद देईल तिने ते करावे. परंतु, सामाजिक दबावाखाली कोणतेही काम करू नये. मला कधीही जोडीदाराची उणीव भासत नाही, अशीही श्वेता तिवारी म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

SCROLL FOR NEXT