siddharth chandekar shared post about missing one thing in london trip sakal
मनोरंजन

शौचालयातील 'या' गोष्टीचा सिद्धार्थला लळा, व्हिडिओ पाहून वेडे व्हाल..

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने एक विडिओ पोस्ट केला आहे.

नीलेश अडसूळ

siddharth mitali : मराठी मनोरंजन विश्वातील गाजलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) आणि मिताली मयेकर (mitali mayekar). त्यांचे प्रेम, लग्न आणि सोशल मीडियावर येणारे फोटो यामुळे या जोडीने मोठा चाहता वर्ग मिळवला आहे. ते दोघेही सोशल मीडिया वर प्रचंड सक्रिय आहेत. गेल्या वर्षी ते लग्नबंधनात अडकले. सिद्धार्थ हा उत्तम अभिनेता आहे. त्याने केलेल्या मालिका आणि चित्रपट कायमच लक्षात राहतात. काही दिवसांपूर्वी च त्याचा 'झिम्मा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. मध्यंतरी सिद्धार्थ लंडन येथे चित्रीकरणासाठी गेला होता. यावेळी त्याने एक भन्नाट व्हिडिओ शूट केला आहे. नुकताच त्याने हा व्हिडिओ शेअर केला असून पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. (siddharth chandekar shared post about missing one thing in london trip)

लोकेश गुप्ते दिग्दर्शिक congratulations या सिनेमाचं शुटींग लंडन येथे सुरु होते. या चित्रपटात सिद्धार्थ प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आटपून सिद्धार्थ नुकताच मुंबईला परतला आहे. लंडनसारख्या प्रगत देशात अनेक दिवस राहूनही सिद्धार्थला एका गोष्टीची प्रचंड उणीव जाणवत होती. त्यामुळे त्याने मुंबईत आल्या आल्या एक व्हिडीओ तयार करून शेअर केला आहे.

सिद्धार्थनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो अत्यंत भावूकी झालेला दिसतो आहे. पण नंतर आपल्या हसू आवरणार नाही अशी गिष्ट सिद्धार्थ ने केली आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ म्हणतो, 'यार लंडनमध्ये तुझी खूप आठवण आली. सगळं होतं तिथे पण, तु नाही.. किती प्रगत देश आहे तो किती काय काय आहे तिथे. पण तुला जे जमतंना ते कोणालाच जमू शकत नाही. काय.. मिस केलं यार मी तुला, काय मिस केलं. तुझ्यासारखं कोणीही नाहीये या जगात कोणीही नाही. आय लव्ह यू'.' या व्हडिओच्या शेवटी बाथरुममध्ये असलेल्या स्प्रेकडे कॅमेरा फिरवतो.लंडनमध्ये सिद्धार्थ मिस करत असलेली गोष्ट दुसरी तिसरी कोणतीही नसून बाथरुममधला स्प्रे आहे. हे व्हिडीओच्या शेवटी कळतं. व्हिडीओचा शेवट पाहून कुणालाही हसू आवरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

World Youngest Billionier : वयाच्या 22 व्या वर्षी अब्जाधीश! भारतीय वंशाच्या दोन तरुणांसह तीन मित्रांची अविश्वसनीय कामगिरी

Nashik News : कोवळ्या वयासाठी 'बोल्ड' विषय नको! नाट्य संघांच्या मागणीनुसार हौशी मराठी नाट्यस्पर्धेत लहान मुलांना प्रवेश नाही

Dev Deepawali 2025 Travel Tips : देव दिवाळीला वाराणसीला जाऊ शकत नाही? मग भेट द्या 'या' अद्भुत ठिकाणांना

SCROLL FOR NEXT