Coffee Movie
Coffee Movie 
मनोरंजन

सिद्धार्थ-स्पृहा-कश्यपची 'कॉफी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्वाती वेमूल

जिच्या केवळ सुगंधानंच मन प्रफुल्लीत होतं, शरीराला आलेला थकवाही परागंदा होतो ती म्हणजे कॉफी. पूर्वीपेक्षा आजच्या जनरेशनमध्ये कॉफी वेगवेगळ्या कारणांमुळं पॅाप्युलर आहे. कॉफीचा सुगंध, फेसाळता भलामोठा कॉफी मग, मोठ्या कलाकुसरीनं त्यात चितारलं जाणारं बदामाचं पान-डिझाईन्स आणि जिवलग व्यक्तीचा सहवास.. म्हणजे अर्थातच डेट असं काहीसं तरुणाईमध्ये कॉफीचं समीकरण बनलं आहे. येत्या १४ जानेवारीला रसिकांना चित्रपटगृहांमध्ये 'कॅाफी'चा स्वाद चाखायला मिळणार आहे. गोड चेहऱ्याची आणि कवी मनाची अभिनेत्री अशी ओळख असणारी स्पृहा जोशी (Spruha Joshi) रसिकांसाठी ही 'कॉफी' (Coffee) घेऊन आली आहे. तिच्या जोडीला आहेत सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि कश्यप परुळेकर.

‘तन्वी फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या 'कॉफी'ची निर्मिती कैलास सोरारी आणि विमला सोरारी यांनी केली असून या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं आहे. आजवर नेहमीच विविधांगी विषयांवर चित्रपट बनवणारे नितीन यावेळी प्रेक्षकांसाठी लज्जतदार 'कॉफी' घेऊन आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना अनोखी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. प्रेम आणि कॉफीचा सुखद संगम या चित्रपटाच्या निमित्तानं घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कॉफी जशी थोडी गोड, थोडी कडवट असते तशीच लव्हस्टोरीही असते. प्रेमाची अनुभूती झाल्यावर येणारी जवळीक, एकमेकांची ओढ, तासनतास चालणाऱ्या गप्पा, एकमेकांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता ही प्रेमाची गोड बाजू मानली, तर द्विधा मन:स्थिती, छोटया मोठया कुरबुरी आणि प्रेमातील अडथळ्यांसारख्या कडवट बाजूही अनुभवायला मिळतात. याच कारणांमुळं 'कॉफी' हा चित्रपट आजवर पाहिलेल्या प्रेमकथांपेक्षा एक वेगळी लव्हस्टोरी सांगणारा ठरणार आहे. या चित्रपटात उत्साही, हरहुन्नरी आणि नेहमी प्रसन्न असणारा सिद्धार्थ दिसेल. कश्यपनं साकारलेल्या कॅरेक्टरचा स्वभाव मात्र काहीसा गंभीर आणि समजूतदार असल्याचं पहायला मिळेल. या दोघांना सांभाळून घेणारी लव्हेबल स्पृहा या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे.

कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांनी लिहीली असून, मच्छिंद्र यांनीच नितीन यांच्या साथीनं संवादलेखनही केलं आहे. नितीन यांनी अशोक बागवे यांच्यासोबत या चित्रपटासाठी गीतलेखनही केलं असून, त्यांना तृप्ती चव्हाण यांनी संगीतसाज चढवला आहे. आय. गिरीधरन यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे, तर संकलन राहुल भातणकर यांचं आहे. हरिश आईर यांनी कलादिग्दर्शनाची, तर संजय कांबळे यांनी कार्यकारी निर्मात्यांची जबाबदारी चोख बजावली आहे. येत्या १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT