Sidharth Malhotra & Kiara Advani Wedding Google
मनोरंजन

Kiara Sidharth चं लग्न दाखवलं जाणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर..एका फोटोनं चर्चेला उधाण..

एका ओटीटी कंपनीनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कियारा सिद्धार्थच्या फोटोसोबत त्यांच्या लग्नाच्या व्हेन्यूचा फोटो शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

Sidharth Malhotra & Kiara Advani Wedding: 6 फेब्रुवारी 2023 रोजी बीटाऊनचं आणखी एक क्यूट कपल लग्नबंधनात अडकतंय. अथिया शेट्टीनंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा आपली गर्लफ्रेंड कियारा अडवाणी सोबत लग्न करणार आहे.

मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार दोघांचे लग्न जैसलमेर येथील फाइव्ह स्टार हॉटेल सूर्यगढ मध्ये होणार आहे. या लग्नासंबंधित सोहळ्यांची सुरुवात ५ फेब्रुवारी रोजी होईल. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की विघ्नेश शिवन आणि नयनतारा यांच्याारखंच आता सिद्धार्थ आणि कियारा देखील आपल्या लग्नाची डॉक्युमेन्ट्री बनवण्याची योजना आखत आहेत.

त्याचं झालं असं की अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे.

या फोटोत कपलसोबत राजस्थानचा किल्ला देखील नजरेस पडत आहेत. या फोटोला पाहिल्यानंतर आता अंदाज लावला जात आहे की सिद्धार्थ कियारा देखील विघ्नेश शिवन आणि नयनतारा सारखं आपली लव्ह स्टोरी को-डॉक्यमेंट्रीच्या रुपात स्ट्रीम करण्याची योजना आखत आहेत.

अर्थात यात काय खरं-काय खोटं हे समोर आलेले नाही.

एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार कळत आहे की,'' अॅमेझॉन प्राइम व्हिडीओनं शेअर केलेला तो फोटो 'शेरशाह' सिनेमाचा आहे. सिद्धार्थ आणि कियारानं आपल्या लग्नाचे राइट्स कोणालाच अद्याप विकलेले नाहीत''.

''ओटीटी प्लॅटफॉर्मने हे फोटो फक्त त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पोस्ट केले आहेत. या फोटोचा यापेक्षा आणखी कुठला दुसरा अर्थ नाही''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : तिघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा खात्मा, पिंपरखेडमध्ये शार्पशूटरने झाडल्या गोळ्या

Pune Weather : पुणे गारठणार! पुढील 3-4 दिवसांत तापमानात मोठी घट; हवामान विभागाचा अंदाज

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

SCROLL FOR NEXT