Sidharth Malhotra & Kiara Advani Wedding Instagram
मनोरंजन

Sidharth Malhotra लग्नात कियारा अडवाणीच्या पाया का पडला? जाणून घ्या यामागचं खास कारण..

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नसोहळ्या दरम्यान घडलेल्या काही इंट्रेस्टिंग गोष्टींचा आता खुलासा होताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Sidharth Malhotra & Kiara Advani Wedding: नुकतचं बॉलीवूडचं क्यूट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं लग्न झालं आहे. आता त्यांच्या लग्नसोहळ्या संबधित इंट्रेस्टिंग गोष्टी समोर येत आहेत.

आता लेटेस्ट रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे की लग्नाच्या काही विधी केल्या जात होत्या त्या दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा कियाराच्या पाया पडला. याआधी समोर आलं होतं की लग्नात कियाराची आई आणि भाऊ भावूक झालेले दिसले त्यावेळी सिद्धार्थनं घरच्या मुलाप्रमाणे खूप छानपणे सगळं हॅंडल केलं.

त्यानं घरातल्या मोठ्या मुलाप्रमाणे केवळ आपल्या सासूला सांभाळलं नाही तर आपल्या बायकोला देखील छान सांभाळलं. बातमी आहे की कियारा देखील काही विधी दरम्यान खूप रडली.(Sidharth Malhotra touched kiara advani feet know the exact reason)

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्या दरम्यान घडलेली एक इंट्रेस्टिंग गोष्ट समोर येत आहे. बोललं जात आहे की लग्नाच्या विधी दरम्यान सिद्धार्थ आपल्या धर्मपत्नीच्या म्हणजे कियारा अडवाणीच्या पाया पडला.

खरंतर लग्नाच्या विधी दरम्यान आपण पाहतो की पत्नी आपल्या पतीच्या पाया पडते. पण पती-पत्नीत फरक नको..दोघे समान पातळीवर आहेत म्हणून सिद्धार्थ देखील कियारा त्याच्या पाया पडल्यावर लगेच तिच्या पाया पडण्यासाठी झुकला...असं म्हटलं जात आहे.

कियारानं सिद्धार्थला एक इमोशनल गिफ्ट दिलं. तिनं त्याच्यासाठी खास कस्टमाइज्ड कलीरे डिझाइन केले होते. त्यामध्ये सिद्धार्थचा पाळीव कुत्रा ऑस्करचा चेहरा डिझाइन करुन कियारानं घेतला होता. ऑस्करचं गेल्या वर्षीच निधन झालं आहे. तो सिद्धार्थच्या खूप जवळचा होता.

सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न जैसेलमेरला सूर्यगढ फोर्ट पॅलेसमध्ये झालं होतं. तिथे नो मोबाईल-कॅमेरा पॉलिसी होती. यामुळे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर येऊ शकले नाहीत.

लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारानं आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही क्यूट फोटो शेअर केले आहेत. आता लोक वाट पाहतायत ते दोघांच्या लग्नाच्या व्हिडीओजची. काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

एका व्हिडीओवरनं दावा केला जात आहे की तो कियारा-सिद्धार्थच्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ आहे. पण कियाराच्या हातावर त्या व्हिडीओत मेहेंदी नसल्यामुळे लोकांना त्यावर डाऊट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT