Hanuman Jayanti 2023: Danish Akhtar Saifi Instagram
मनोरंजन

Sidharth Shukla नं नकार दिला तेव्हा एका मुस्लिम अभिनेत्यानं साकारलेला हनुमान.. हनुमान चालिसाही आत्मसात केली होती..

टी.व्ही मालिका 'सिया के राम' मध्ये हनुमानाची भूमिका साकारणारा दानिश अख्तर सैफी हा लहानपणापासूनच हनुमानाचा भक्त आहे.

प्रणाली मोरे

Hanuman Jayanti 2023: आज संपूर्ण भारतात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आजचा दिवस म्हणजे पवनपुत्र आणि माता अंजनीचा सुपूत्र हनुमान यांचा जन्मदिन आहे. या खास दिवशी चला जाणून घेऊया टी.व्हीच्या एका हनुमानाचा किस्सा.

टी.व्ही मालिका 'सिया के राम' मध्ये हनुमानाची भूमिका दानिश अख्तर सैफीनं साकारली होती. तसं पाहिलं तर हनुमान ही व्यक्तिरेखा अनेक कलाकारांनी साकारली आहे. रामाचा भक्त असलेल्या हनुमानाचा व्यक्तिरेखा ज्या-ज्या कलाकारांनी साकारली आहे त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा नेहमी सन्मानपूर्ण राहिला आहे.(Sidharth Shukla rejected this muslim actor played the role of hanuman)

पण तुम्हाला माहित आहे का 'सिया के राम' मधील हनुमान ही व्यक्तिरेखा सुरुवातीला बिग बॉस विनर सिद्धार्थ शुक्लाला ऑफर झाली होती. आता यावर त्याचं उत्तर काय होतं हे कोणाला स्पष्ट माहित नाही. मेकर्सनी या भूमिकेसाठी सिद्धार्थला अप्रोच केलं होतं एवढं मात्र नक्की.

पण त्यानंतर खूप मनापासून ही हनुमानाची भूमिका साकारताना दिसला तो अभिनेता दानिश अख्तर सैफी. दानिश भले मुसलमान असेल पण तो पवनपुत्र हनुमानाचा मोठा भक्त आहे. दानिश अभिनेता होण्यासोबत एक पैलवान देखील आहे.

हेही वाचा: सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दानिशचं व्यक्तिमत्त्व खूपच भारदस्त असल्यानं हनुमानाच्या भूमिकेसाठी तो परफेक्ट होता. त्यामुळे मेकर्सनी वेळ न दवडता लगेचच 'सिया के राम' मधील हनुमान म्हणून दानिशला कास्ट केलं.

'सिया के राम' २०१५ साली छोट्या पडद्यावर प्रसारित केली जायची. स्वतः दानिशनं या गोष्टीचा खुलासा केला होता की तो हनुमानाचा भक्त आहे. लहानपणापासूनच तो हनुमानाला ईश्वरसमान मानत आलाय असं देखील तो म्हणाला होता. दानिश हा बिहारमधील सिवान इथला राहणारा आहे. तो आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.

दानिशला लहानपणापासून रेसलर बनायचं होतं. द ग्रेट खलीनं त्याला WWE साठी ट्रेन केलं होतं..असं देखील दानिश म्हणाला होता. खलीनं दानिशला तब्बल ६ महिने ट्रेनिंग दिलं होतं. पण निवडी दरम्यान आवश्यक कागदपत्र देऊ न शकल्यानं दानिश अमेरिकेला जाऊ शकला नाही. त्यानंतर तो मुंबईत आला. आणि त्याला हनुमानाची भूमिका ऑफर झाली. हनुमानाच्य़ा भूमिके व्यतिरिक्त दानिशनं कन्नड सिनेमात भीमाची व्यक्तिरेखा साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT