Diljit Dosanjh Esakal
मनोरंजन

Diljit Dosanjh:सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी सरकारचं जबाबदार ....दिलजीतचा गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

दिलजीत दोसांझ ने अल्पावधितच स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तो सर्वोत्कृष्ट पंजाबी गायक आहे. दिलजित त्याच्या आवाजासाठी आणि हळव्यासाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा दिलजीत दोसांझ सिद्धू मुसेवाला आणि दीप सिद्धूच्या मृत्यूवर बोलला आहे. 29 मे रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी त्यांने सरकारलाच जबाबदार धरले.

एका मुलाखतीदरम्यान, दिलजीत दोसांझने सिद्धू मुसेवालाच्या पालकांबद्दल सांगितले. मुलाच्या मृत्यूनंतर आपल्याला किती वेदना होत असतील हे सांगत याशिवाय त्यांनी यासाठी सरकारला जबाबदार धरले. दिलजीत मूसवाला आणि दीप सिद्धूबद्दल बोलतांना तो म्हणाला, "या सर्वांनी आयुष्यात खूप मेहनत केली आहे. एखादा कलाकार कोणाचंही वाईट करू शकतो असं मला वाटत नाही."

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

या सर्वांनी खूप मेहनत घेतल्याचे दिलजीत दोसांझने एका मुलाखतीत सांगितले, "कोणताही गायक काही चुकीचे करू शकेल असे मला वाटत नाही. हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. त्याच्या आणि इतर लोकांमध्ये काहीही येऊ शकत नाही. मग त्याला कोणी का मारेल? हे अतिशय दुःखद आहे."

यासाठी हे सरकार 100 टक्के जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं. "हे राजकारण आहे आणि राजकारण अत्यंत घाणेरडं आहे. त्याला न्याय मिळावा आणि अशी दु:खद घटना पुन्हा घडू नये यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. आपण या जगात एकमेकांना मारण्यासाठी आलो नाही, हे सुरुवातीपासूनच घडत आले आहे. यापूर्वीही कलाकारांच्या हत्या झाल्या आहेत. मला आठवते की मी सुरुवात केली तेव्हा समस्या होत्या. लोकांना आश्चर्य वाटायचे की हा माणूस इतका यशस्वी का होतोय पण कुणाला तरी मारण्यासाठी... मला माहीत नाही. ही 100% सरकारची चूक आहे आणि माझ्या मते हे राजकारण आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Local: लोकलसंदर्भात मोठी अपडेट! पुणे स्टेशनवरुन लोकल ट्रेन सुटणार नाहीत

MS Dhoni: यंदा न खेळताच धोनीची ‘आयपीएल’मधून निवृत्ती? अखेरच्या मोसमाची शक्यता

Bidkin Crime DMIC: बिडकीन DMIC परिसरात दोन तरुणांचे मृतदेह; विषारी औषधाची बाटली आढळल्याने संशय, तपास सुरू..

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून महिलेचा मृत्यू

IPL 2026, Purple Cap: भुवनेश्वर कुमारने बुमराहच्या पंक्तीत स्थानही मिळवलं अन् पर्पल कॅपही डोक्यावर चढवली; शर्यतीत टॉप-५ कोण?

SCROLL FOR NEXT