singer Hardy Sandhu molested by woman in live show SAKAL
मनोरंजन

Hardy Sandhu: "तिने मला मिठी मारली अन् माझ्या कानाला...", गायक हार्डी संधूचा महिलेकडून विनयभंग

गायक हार्डी संधूने विनयभंग झाल्याचा अनुभव शेअर केलाय

Devendra Jadhav

Hardy Sandhu News: लोकप्रिय गायक हार्डी संधूने त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. हार्डीचं फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. हार्डीने स्वतःच्या सुमधुर गाण्यांनी संगीतविश्वात स्वतःचं नाव कमावलं आहे. हार्डीने अनेकदा देश - विदेशात लाईव्ह परफॉर्मन्स शो करत असते.

या शोमध्ये हार्डीचे फॅन्स येत असतात. हार्डीच्या या लाईव्ह शोला फॅन्सची प्रचंड गर्दी असते. पण अशाच एका लाईव्ह शोमध्ये हार्डीचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना घडली होती. काय झालं होतं याचा स्वतः हार्डीने खुलासा केलाय.

(singer Hardy Sandhu molested by woman in live show)

हार्डीने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे. हार्डीने सांगितले की, एका मध्यमवयीन महिलेने त्याचा विनयभंग केला होता.

अलीकडेच एका मीडिया मुलाखतीत हार्डी संधूने त्याच्यासोबत झालेल्या शोषणाबद्दल खुलासा केला की, एका खाजगी लग्नात तो परफॉर्म करण्यासाठी कसा गेला होता. यावेळी एका महिलेने त्याला अनुचित स्पर्श केला. या महिलेचे वय 30 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे. ती नाचत होती आणि तिला माझ्यासोबत स्टेजवर यायचे होते. (Latest Marathi News)

हार्डी पुढे खुलासा करत म्हणाला की, "ती महिला स्टेजवर येण्याचा आग्रह करत होती. मी तिला सांगितले की, मी जर तुला स्टेजवर बोलावले तर इतर लोकंही तसंच करतील. पण तरीही ती ऐकत नव्हती.

अखेर मी तिला स्टेजवर येण्याची परवानगी दिली. त्या महिलेने मला तिच्यासोबत एका गाण्यावर नाचण्याची विनंती केली. मी म्हणालो ठीक आहे. गाण्यावर नाचल्यानंतर त्या बाईने मला तिला मिठी मारण्यास सांगितले. मी हो म्हणालो. तिने मला मिठी मारली आणि नंतर माझ्या कानाला गैरप्रकारे स्पर्श केला."

अशाप्रकारे हार्डीने त्याला आलेला विनयभंगाचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला. लोकप्रिय गायक हार्डीने 83 सिनेमातुन त्याच्या अभिनयाची जादूही दाखवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT