neeti mohan,nihaar pandya file image
मनोरंजन

श्रेया घोषालनंतर आता 'या' गायिकेच्या घरी होतंय नव्या पाहुण्याचं स्वागत

सोशल मीडियावर पोस्ट लिहित दिली आनंदाची बातमी

प्रियांका कुलकर्णी

प्रसिद्ध गायिका निती मोहनने Neeti Mohan मुलाला जन्म दिला. नितीचा पती निहार पांड्या Nihaar Pandya याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली. नितीसोबतचा फोटो शेअर करुन निहारने त्याला कॅप्शन दिले, 'जे माझ्या वडिलांनी मला शिकवले, ते सर्व माझ्या सुंदर पत्नीने माझ्या छोट्या मुलाला शिकवण्याची संधी दिली आहे. ती प्रत्येक दिवशी माझ्या आयुष्यामध्ये आनंद पसरवत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निती आणि बाळाची प्रकृती ठीक आहे. मोहन आणि पांड्या परिवाराकडून तुम्हा सर्वांचे आभार.' (singer neeti mohan blessed with a baby boy husband nihaar pandya share post )

निहारच्या या पोस्टला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून निहार आणि नितीला शुभेच्छा दिल्या आहेत. नितीची बहिण आणि प्रसिद्ध डान्सर शक्ती मोहनने देखील निहारच्या या पोस्टला कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. शक्तीने कमेंट केली, 'मी खूप आनंदी आहे. बाळाच्या आई वडिलांचे अभिनंदन. आता मी मावशी झाले. आता आम्ही तुमच्या छोट्या मुलाला बिघडवण्यासाठी तयार आहोत. सर्व मावशींनी तयार राहा.'

निती मोहनने फेब्रुवारी महिन्यामध्ये तिच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त तिचे काही फोटो शेअर करून ती आई होणार आहे अशी गुड न्यूज सांगितली होती. ' 1+1=3, होणारी आई आणि होणारे बाबा, ही बातमी देण्यासाठी आमच्या लग्नाचा वाढदिवसासारखा उत्तम दिवस कोणता असेल का?', असं कॅप्शन तिने दिलं होतं. निती मोहन आणि निहार पांड्याने 15 फेब्रुवारी 2019 रोजी लग्न केले.

शक्ती, मुक्ती आणि निती या तिन्ही बहिणी इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहेत. त्यापैकी शक्ती आणि मुक्ती या दोघी डान्सर असून निती ही गायिका आहे. 'मनवा लागे', 'फर्स्ट क्लास', 'जिया रे', 'इश्कवाला लव्ह', 'कश्मीर मै तू कन्याकुमारी' यांसारखी प्रसिद्ध बॉलिवूड गाणी नितीने गायली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT