singer sona mohapatra reacts on dmk leader dindigul leones comment that women lost 8 shaped hips because they consume foreign cow milk 
मनोरंजन

'तो मुर्ख नेता आहे', सोना जाम भडकली; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सध्या देशातल्या काही राज्यांमध्ये निवडणूकींची रणधुमाळी रंगलेली दिसत आहे. त्यावेळी अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मात्र याप्रसंगी काही नेत्यांनी बोलताना सभ्यतेची पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. डीएमकेचे एक नेते डिंडीगुल लियोनी यांनी एक भलतेच वादग्रस्त विधान केले आहे. त्याचा सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यात सेलिब्रेटी गायिका सोना महापात्रा हिच्या नावाचा समावेश आहे. तिनं डिंडीगुल यांच्या विधानाचा निषेध करुन त्यांच्यावर परखड टीका केली आहे. डिंडीगुल यांनी ज्याप्रकारचे विधान केले होते त्यावरुन महिला वर्गामध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरुन त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे.

गायिका सोना महापात्रानं आता डीमएकेच्या नेत्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. लियोनी यांच्याविषयी सांगायचे झाल्यास ते तामिळनाडू मधील एक उमेदवार आहेत. त्यांनी आपल्या प्रचार दौ-यात महिलांच्या शरीरयष्टीबाबत एक विधान केले होते. ते म्हणाले होते देशातील मॉडर्न महिला आता आठ आकारासारख्या दिसत नाही. याचे कारणं म्हणजे त्यांनी विदेशी गाईचे दुध पिण्यास सुरुवात केली आहे. सोनानं जेव्हा डिंडीगुल यांचे हे विधान ऐकले तेव्हा तिनं डिंडीगुल यांना मुर्ख म्हटलं आहे. अशाप्रकारचे विधान करणा-या नेत्याला मुर्ख म्हणणं योग्य ठरेल. असे मत तिनं व्यक्त केलं आहे.

सोनानं सोशल मीडियावर एक व्टिटही केलं आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, तामिळनाडू पासून उत्तराखंडपर्यत अनेक महाभाग आपल्याला दिसून येतील. त्यांची संख्या काही कमी नाही. अशा प्रकारच्या मुर्खांना सेक्सिझम आणि महिलांच्या विरोधात बोलण्याची सवयच असते. ही मुर्खता लोकांना आकर्षित करते का, हा प्रश्न आहे. त्याचे उत्तरही तुम्हाला माहिती आहे. लोकांनी आपल्याला ओळखावे, आपल्या बोलण्यावर हसावे यासाठी अशाप्रकारची विधानं केली जातात. पुरुषत्वाला अधिक महत्व देण्याच्या बहाण्यानं ही विधानं केली जातात. असे वाटत असल्याची भावना सोनानं व्यक्त केली.

यापूर्वी फाटक्या जीन्सवरील वादाप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यानंतर प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्राला धमक्यांचे मेसेज येऊ लागले आहेत. याप्रकरणी तिने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शनसुद्धा बंद केलं आहे. सोनाने गुरुवारी मुंबई पोलिसांनी टॅग करत लिहिलं, 'इन्स्टाग्रामवर मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. इतकंच नव्हे तर माझं अकाऊंट हॅक करण्याच्याही धमक्या दिल्या जात आहेत. माझ्यासाठी अपशब्द वापरले जात आहेत. ठराविक लोकं मिळून माझ्यावर निशाणा साधत आहेत. मी माझं कमेंट सेक्शन बंद केलं आहे.

याप्रकरणी सोनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देवी कालीचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'जगाला दाखवण्याइतपत माझे गुडघे संस्कारी नाहीत का?' सोनाच्या या पोस्टवरून तिला ट्रोल करण्यात आलं. याविषयी तिने नंतर ट्विटरवर लिहिलं, 'पाच दिवसांनंतरही मला धर्माच्या ठेकेदाऱ्यांकडून धमक्या येत आहेत, मला शिवीगाळ केली जातेय. आजच मी १०० हून अधिक लोकांना ब्लॉक केलंय आणि त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.'
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT