मनोरंजन

'पवित्र रिश्ता' ते 'छिछोरे' पर्यंतचा जाणून घ्या सुशांत सिंहचा जीवनपट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  ; एम एस धोनी या सुपरहीट चित्रपटाचे अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून कळाले नाही. पोलिस तपास सुरु आहे. अभिनेते सुशांत सिग राजपूत हे केवळ 34 वर्षाचे होते. सुरुवातीला टिव्ही मालिकामध्ये काम केल्यानंतर राजपूत यांनी बॉलीवडूमध्ये यशस्वी एंट्री केली.अल्पावधीतचं त्यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

अल्प परिचय
मूळचा बिहारचा असलेल्या सुशांत सिंग राजपूतचा जन्म २१ जानेवारी १९८६ मध्ये झाला. सुशांत सिंग राजपूतने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली. माॅडेलंग करीत असतानाच निर्माती एकता कपूरने त्या जिस देश मे है मेरा दिल या मालिकेत सर्वप्रथ्म संधी दिली. परंतु छोट्या पडद्यावर त्याला अधिक लोकप्रियता मिळाली ती एकता कपूरच्याच पवित्र रिश्ता या मालिकेमुळे. सन २००९ मध्ये ही मालिका झी टीव्हीवर आली. यामध्ये सुशांतने मानव देशमुख ही व्यक्तिरेखा साकारली. त्याची ही भूमिका आणि मालिका खूप लोकप्रिय ठरली. या मालिकेत त्याच्याबरोबर काम करणाऱ्या अंकिता लोखंडे आणि त्याची लव्हस्टोरी कमालीची गाजली. काही वर्षे सुशात आणि अंकिता लिव इन रिलेशनशिपमध्ये राहात होते आणि त्यानंतर ते विभक्त झाले. सुशांतला पहिला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला तो दिग्दर्शक अभिषेक
कपूरने.

चेतन भगत यांच्या कादंबरीवर काय पो छे हा चित्रपट अभिषेकने बनविला आणि त्यामध्ये सुशांत सिंगने इशान भट ही भूमिका साकारली. हा चित्रपट यशस्वी ठरला आणि सुशांत सिंगचे हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पण यशस्वी ठरले. त्यानंतर परिणीती चोप्राबरोबर त्याने शुद्ध देसी रोमान्स हा चित्रपट केला . मनीष शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. आदित्य चोप्रा
हे या चित्रपटाचे निर्माते. हा चित्रपटदेखील बाॅक्स आॅफिसवर चांगला चालला आणि तेव्हाच सुशांत सिंग राजपूत लंबी रेस खेळणार हे सिद्ध झाले. हे दोन्ही चित्रपट एकाच वर्षी म्हणजे सन २०१३ मध्ये आले. आमीर खानबरोबर त्याने पीके केला. यामध्ये तो सहकलाकाराच्या भूमिकेत होता. पीकेबरोबरच डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी हा चित्रपट केला आणि मग त्याने भारताचा लोकप्रिय क्रिकेटर व माजी कर्णधार एम.एस. धोनीच्या जीवनावर बेतलेला धोनी...द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात धोनीची व्यक्तिरेखा साकारली. या भूमिकेकरिता त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. धोनीचा फेवरेट हेलिकाॅप्टर शाँट त्याला शिकताना खूप त्रास झाला होता. तरीही या भूमिकेत तो भलताच भाव खाऊन गेला. या चित्रपटाने धवधवीत यश मिळविले. त्यानंतर राब्ता व केदारनाथ असे त्याचे चित्रपट आले आणि आता आणखीन सहा ते सात चित्रपट त्याचे येणारे आहेत.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT