Sirf Ek Bandaa Kaafi Hai Esakal
मनोरंजन

Sirf Ek Bandaa Kaafi Hai: ट्विटरवर 'बंदा'चा डंका! नेटकऱ्यांनी घेतलं डोक्यावर..

Vaishali Patil

Sirf Ek Bandaa Kaafi Hai Twitter Review: अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित आणि अभिनेता मनोज बाजपेयी याचा आगामी चित्रपट 'सिर्फ एक बंदा काफी है' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असतो. 23 मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार झाला आहे. OTT वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं वर्णन सत्य घटनेने प्रेरित ओरीजनल चित्रपट असल्याच सांगितलं जात आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेते मनोज बाजपेयी आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, त्याचा 'सिर्फ एक बंदा काफी है' हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित झाला मग काय विषयच नाही. चाहत्यांनी तो लगेच पाहूनही टाकला. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. मनोज बाईपेयींचा चित्रपट आतापर्यंत ज्यांनीही पाहिला त्यांनी या चित्रपटाचं तोंड भरुन कौतुक केल आहे.

मनोज बाजपेयीची मुख्य भुमिका असलेल्या हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये त्यांची भूमिका प्रख्यात वकील पी.सी. सोलंकी यांच्याकडून प्रेरित आहे. सोलंकी यांनी एका धार्मिक नेत्याविरोधात खटला लढवतो. ज्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. सुमारे पाच वर्षे चाललेल्या या प्रकरणी धर्मगुरूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या चित्रपटातही तसचं काही होत.

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मनोज बायपेयी यांचा चित्रपट ट्विटरवर ट्रेंड करत आहे. ट्विटरवर चाहते सर्वांनाच हा चित्रपट पाहण्याचा सल्ला देत आहेत. चित्रपटाची जोरदार माउथ पब्लिसिटी होत आहे.

अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी चित्रपटाची ट्विटर प्रतिक्रिया घेऊन आलो आहोत. या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना, 'मस्ट वॉच' असं लिहित मनोज वाजपेयीचं कौतुक करत आहे.

मनोज बाजपेयीच्या कौतूकाचे पुल चाहत्यांनी बांधले आहेत. ज्यात एकानं लिहिलं की, "पुन्हा एकदा तुम्ही #Sirf_एक_बंद_काफी_है मधील तुमच्या अप्रतिम अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत, मनोज बाजपेयी लव्ह यू सर अप्रतिम अभिनय."

तर दुसऱ्याने लिहिलयं की, "आपण सर्वांनी 'सिर्फ एक बंदा काफी है' चित्रपटाला पाठिंबा दिला पाहिजे आणि अंध भक्तीची ही साखळी तोडली पाहिजे." असं लिहिलं आहे.

तर एकाने आसाराम बापुवर टिका करत लिहिले की, "आसाराम बापू हा गुन्हेगार आहे आणि तो न्यायालयात सिद्ध झाला आहे. 'सिर्फ एक बंदा कोफी है' मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला त्याच्या चुकीची कठोर शिक्षा द्यायला हवी.

या चित्रपटात मनोज बाजपेयीसह विपिन शर्मा, सूर्य मोहन कुलश्रेष्ठ, अद्रिजा सिन्हा यांच्याही भुमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT