Salman Khan Google
मनोरंजन

''या हसण्यामागे मोठं दुःख दडलेलं आहे'';सलमानची ही प्रतिक्रिया चर्चेत

वाढदिवसानिमित्तानं माध्यमांसमोर दबंग खान झाला व्यक्त....

प्रणाली मोरे

सलमान खानचा(Salman Khan) आज वाढदिवस...बॉलीवूडचा हा दबंग खान आज ५६ वर्षांचा झाला,म्हणजे पार्टी तर होणारंच ना. सलमानचं एक मात्र असतं तो काहीही झालं तरी वाढदिवशी मुंबईत असला तर त्याचं कुंटुंबासोबतचं सेलिब्रेशन ठरलेलं. त्यानं स्वतः एका मुलाखतीत म्हटलं होतं की,''वाढदिवशी सर्वात पहिल्या शुभेच्छा मला आईकडूनच मिळतात,आणि मी त्याची वाट पाहत असतो''. तर असा आपला बॉलीवूडचा भाई हल्ली त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर रीलॅक्स होण्यासाठी ब-याचदा जात असतो. काही त्यांचे फॅमिली गेट टूगेदर सोहळे हे तिथेच पार पडतात. त्यामुळे पनवेलकरांसाठी तसा तो त्यांचा सख्खा शेजारीच बनून गेलाय.

असो हे सगळं सांगायचं कारण इतकंच की आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून यंदा सलमान खान आपले कुटुंबिय आणि काही जवळचा मित्र परिवार असे मिळून पनवेल येथील फार्महाऊसवर गेले होते. तिथे गेलं की सलमान ब-याचदा फार्मिंग करण्यात पुढाकार घेतो. कारण तेथील जमिनीवर त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची थोडक्यात शेतीची लागवड केलीय असंच म्हणूया नं. तर असाच तो शनिवारी तिथं फार्मिंगची आपली इच्छा पुरेपूर भागवल्यानंतर फेरफटका मारत होता. अनं अचानक त्याला सर्पदंश झाला. आता एकदा चावल्यावर आरडाओरडा झाल्यानं सापानं बिचा-यानं घाबरून तीनदा त्याला दंश केला. ताबडतोब हॉस्पिटलमध्ये सलमानला भरती केले,साप विषारी नव्हता म्हणून धोका टळला. त्सायानंतर सापाला पकडून एका बाटलीत बंदिस्त केले आहे,असं स्वत: सलमाननेच त्याच्या पोस्टमधून सांगितले आहे.

असं असलं तरी शेवटी सापच तो,दंश गुणधर्म सोडणार आहे थोडी. सलमान वाचला पण अजून दुखणं काही कमी होईना. हॉस्पिटलमधून परतल्यावर रीतसर कुंटुंबासोबत बर्थ डे सेलिब्रेशन पार पडलं. रविवारी उशिरा फार्महाऊस बाहेर त्याच्या एका फोटोसाठी ताटकळत उभ्या असलेल्या मीडियासमोर तो आला. कुणा कॅमेरामनने 'स्माइल प्लीज' म्हटलं तर छान निखळ हास्य देत तो हसलाही. कुणी तरी मग कमेटं दिली,'लव्हली स्माईल'. तेव्हा मग सलमानच विनोदाने त्या हास्यामागची व्यथा मांडताना म्हणाला,''साप के काटने के बाद ऐसा स्माईल बहुत डिफिकल्ट होता है''. आता त्या बिनविषारी सापाने थेट दबंग खानला नामोहरम केलं म्हणजे तो ग्रेटच म्हणावा नाही का. असू द्या,बर्थ डे बॉय सलमानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,आमच्याकडूनही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : 'करो वा मरो' सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI ठरली! वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंसह उतरणार?

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

ड्रग्स प्रकरणात अडकली, संन्यासी होण्याची हौस फिटली ! 25 वर्षांनी अभिनेत्रीचा टीव्हीवर कमबॅक

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Holi 2026 Song: 45 वर्षांनंतरही कायम हिट! होळीच्या या गाण्यात दिसली होती अमिताभ-रेखा यांची भन्नाट केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT