Soha Ali Khan Birthday esakal
मनोरंजन

Soha Ali Khan Birthday: ऑक्सफर्डमधून शिक्षण, बँकेत नोकरी मात्र बॉलिवूडमध्ये झाली फेल! पतौडी खानदानाचा वारसा लाभलेली सोहा

सोहाचं खास ‘सिक्रेट’ तूम्हाला माहित आहे काय? पतौडी खानदानाचा वारसा लाभलेली सोहा अली खान...

सकाळ डिजिटल टीम

Soha Ali Khan Birthday: सैफ अली खानची बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान 4 ऑक्टोबर रोजी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोहा अली खान सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी तीओटीटीवर सक्रिय आहे.

गेल्या वर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या वेब सीरिज 'हुश हुश'मध्ये दिसली होती. सोहाने तिच्या चित्रपट कारकिर्दीत फारसे चित्रपट केले नसले तरी तिने पडद्यावर आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे.

सोहाचा जन्म 4 ऑक्टोबर 1978 मध्ये नवी दिल्ली झाला. तिचे आजोबा इफ्तिखार अली खान पतौडी आणि वडील मन्सूर अली खान पतौडी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. सोहाची आई शर्मिला टागोर या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

Soha Ali Khan Birthday

पदवी

सोहानं ऑक्सफोर्डमधून मॉर्डन हिस्ट्रीमध्ये पदवी घेतली. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरनॅशन रिलेशन या विषयात मास्टर्सची पदवी घेतली आहे.

Soha Ali Khan Birthday

चित्रपट

सोहाने 2004 साली 'इति श्रीकांता' या बंगाली चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.बॉलिवूडमध्ये तिने शाहिद कपूरच्या 'दिल मांगे मोर' हा पहिला चित्रपट केला.

त्यानंतर तिनं ‘प्यार में ट्विस्ट’, ‘रंग दे बसंती’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘खोया खोया चांद’, ‘साहेब बीबी और गँगस्टर्स रिटर्न्स’ यांसारख्या अनेक सिनेमांत काम केलं.

तिने मेरीडियन लाइन्स, लाइफ गोज ऑन आणि मिडनाइट चिल्ड्रन या इंग्रजी सिनेमांमध्येही अभिनय केलायं.

Soha Ali Khan Birthday

फॅमिली

कुणाल खेमू आणि सोहा अली खान 7 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहत होते.लिव्ह-इनमध्ये जाण्यापूर्वी सोहाने आई शर्मिला यांची परवानगी घेतली होती.त्यांनी 2015 मध्ये लग्न केलं.लिव्ह-इन रिलेशनमुळे ते खूप चर्चेत होते.

Soha Ali Khan Birthday

कुणाल आणि सोहाला एक मुली असून तिच नाव इनाया आहे.तिला पूर्ण वेळ देता यावा यासाठी तिने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र सोहा सोशल मीडियावर खुप सक्रिय असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT