Rupali Chakankar with son Soham Chakankar Esakal
मनोरंजन

Marathi Movie: रुपाली चाकणकरांच्या मुलाची अभिनयात एन्ट्री..'विरजण' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण

'तू आणि मी, मी आणि तू' हे नाव असलेला चित्रपट आता 'विरजण' या नावाने प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. यामध्ये सोहम चाकणकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

प्रणाली मोरे

Marathi Movie: प्रेम ही भावना आहे आणि ती कधीही दुखावली जाऊ शकते हे सांगणारी एक अनोखी कहाणी 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'विरजण' या चित्रपटातून सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.

प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत याची जाणीव या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर यांची फ्रेशजोडी करून देणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पुणे येथे पार पडला. सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्या हस्ते या सोहळ्याचे उदघाटन करण्यात आले.

तर 'सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन'चे डॉ. संजय चोरडिया, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक प्रवीणकुमार नाहटा, प्रदीपजी नाहर, जुगराजजी जैन, महेंद्रजी पातारे तसेच 'विरजण' चित्रपटातील कलाकार आणि चित्रपटाची टीम यांनी सोहळ्याला उपस्थित राहून चारचाँद लावले. (Soham Chakankar Debut in marathi movie son of rupali chakankar)

कोणत्याही कलाकृतीला भाषा, प्रांत, कशाचही बंधन नसतं असं म्हटलं जातं. आणि याची पुन्हा एकदा नव्याने जाणीव तेलुगू गायिका सत्यावथी मंगली हिने करून दिली आहे. 'विरजण' या चित्रपटातील 'देवा' या गाण्याला मंगलीने सुमधुर स्वरात स्वरसाज चढवलाय.

'देवा' या गाण्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मंगली गायन नवीन आकर्षण बनली आहे. 'विरजण' चित्रपटातील 'देवा' या गाण्याला मंगलीने आवाज देऊन मराठी सिनेविश्वात नव्याने ठसा उमटविला आहे. या गणायची जबाबदारी मंगलीने उत्तमरीत्या पेलवली असून प्रशांत सातोसे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

तर या गाण्याचे बोल विनायक पवार लिखित आहेत. दुर्गेश राजभट्ट याने या गाण्याची म्युझिक प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे, तर संकेत टोळे याने हे गाणं मिक्स अँड मास्टर्ड केले आहे.

देवा' या गाण्याला मिळालेल्या मंगलीच्या आवाजासह शिल्पा आणि सोहमची लव्हेबल केमिस्ट्री कशी असेल याचा अंदाज येतोय. 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत निर्माते सागर जैन, ऋषभ कोठारी, राजू तोडसाम निर्मित आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित 'विरजण' हा चित्रपट असून या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी यांनी लिहिली आहे.

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

'तू आणि मी, मी आणि तू' हे नाव असलेला चित्रपट आता 'विरजण' या नावाने प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा कुठे विरजण घालणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर चित्रपटातील गाण्यांनी ही उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT