Somy Ali Salman Khan Ex Girlfriend esakal
मनोरंजन

Somy Ali Salman Khan Ex Girlfriend : सलमानची कुंडली बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही

सोमी अलीनं खरं तर यापूर्वी देखील भाईजानवर असेच आरोप करुन लक्ष वेधून घेतले होते.

युगंधर ताजणे

Somy Ali Cryptic Post on Abusive Relationship : सलमानच्या अफेयरविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. त्यानं आजवर अनेक जणींचा विश्वासघात केल्याचे त्याच्याच मैत्रींणींनी सांगितले आहे. सलमानला त्याचे काही वाटत नाही. अशा प्रकारचे आरोप सलमानच्या एका एक्स गर्लफ्रेंडनं केले आहेत. तिचे नाव सोमी अली असे आहे.

सोमी अलीनं खरं तर यापूर्वी देखील भाईजानवर असेच आरोप करुन लक्ष वेधून घेतले होते. ऐश्वर्या रॉय पूर्वी सलमानचे वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते. त्यात सोमी अलीच्या नावाचाही समावेश होता. तिनं आता तर आपण सलमानची सगळी कुंडली बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही. असे म्हटले आहे. सोमी अली आणि संगीता बिजलानी यांचे नाव सलमानच्या मैत्रींणीच्या यादीतील एक नाव आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

संगीता बिजलानी आणि सलमानचे लग्न होणार होते. मात्र ऐनवेळी संगीताला त्याच्याविषयी काही गोष्टी कानावर आल्यानं तिनं ते लग्न करण्यास नकार दिला. सलमानच्या अफेयरच्या बातम्या तिच्यापर्यत पोहचले होते. सलमान भलेही आता एक सुपरस्टार असेल पण त्याच्या काही गोष्टी लोकांपर्यत पोहचायला हव्यात. असे मला वाटते म्हणून मी त्याची पोलखोल करणार आहे. त्याशिवाय शांत बसणार नाही.

सोमीनं तिच्या इंस्टावरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिनं कुणाचं नाव घेतलेलं नाही. पण तरीही ती कुणाविषयी बोलते आहे हे कळते आहे. तिनं यावेळी तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे त्याबद्दल सोमीनं राग व्यक्त केला आहे. ज्या व्यक्तींना चाहते सपोर्ट करतात त्याविषयी देखील सोमीनं आगपाखड केली आहे. मला माहिती आहे की, आता माझी पोस्ट वाचल्यानंतर ती डिलिट करावी असे सांगण्यात येईल.

मी मानसिकदृष्ट्या खंबीर नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. माझ्या दारु पिण्याच्या सवयीवर बोललं जाईल. पण त्यातून तुम्ही जी गोष्ट खरी आहे ती बाहेर येण्यापासून थांबवू शकणार नाही. ज्यांनी माझे करिअर संपवले मी त्यांच्याविषयीही बोलणार असेही तिनं म्हटले आहे. यापूर्वी सोमीनं ऐश्वर्यावरुन देखील एक पोस्ट शेयर केली होती. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT