Sonakshi-Reena  esakal
मनोरंजन

Sonakshi-Reena : सोनाक्षी सिन्हा आणि रीना रॉय ‘सेम-टू-सेम’ कशा काय दिसतात?

शत्रुघ्न आणि रीना यांचे गाजलेले प्रेमप्रकरण तूम्हाला माहितीय का?

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान  नेहमीच नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो. त्याच्या दबंग चित्रपटाच्यावेळीही त्याने 2010 मध्ये एका अभिनेत्रीला लॉन्च केले होते. त्या अभिनेत्रीला पाहून लोकांना या जेष्ट अभिनेत्री रीना रॉय तर नाहीत ना?असेच वाटू लागले. पण, ती रीना नव्हती तर ती होती बॉलिवूडचे बादशहा शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी.

2000 मध्येच बॉलिवूडला रामराम केलेल्या रीना रॉय यांनी परत कमबॅक केले की काय? असे वाटू लागले. कारण, हो सोनाक्षी आणि रीना रॉय यांचा चेहरी हुबेहुब दिसतो. सोनाक्षीला पाहुन लोकांना रीना यांचाच भास व्हायला लागला. पण, त्यानंतर दबंग आणि बऱ्याच चित्रपटात सोनाक्षी झळकली आणि तिने तिची वेगळी ओळख निर्माण केली.

इतकंच नाही तर अभिनेत्रीची वैशिष्ट्ये पाहून अगदी कमी आवाजात रीना रॉय ही सोनाक्षी सिन्हाची खरी आई असल्याचंही सांगण्यात आलं. बदनामीच्या भीतीने दोन्ही स्टार्सनी अद्याप हे गुपित उघड केलेले नाही.

रीना रॉय आज भलेही चित्रपट जगतापासून दूर गेल्या असल्या तरी त्यांच्या अभिनयाच्या आठवणी आजही चाहत्यांच्या हृदयात ताज्या आहेत. 70 च्या दशकात रीना यांनी आपल्या शानदार अभिनयाने खूप प्रसिद्धी मिळवली. याशिवाय रीना शत्रुघ्न सिन्हासोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत असायच्या. असे असले तरी, रीना आणि सोनाक्षी यांच्यात असलेले हे साम्य एक कोडे आहेच. त्यावर खुद्द रीना यांनीच उत्तर दिले आहे.  

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान रीना रॉय यांनी सोनाक्षी सिन्हाला पहिल्यांदा भेटल्याबद्दल सांगितले. एका मुलाखतीत त्यांनी हा निव्वळ योगायोग असल्याचे म्हटले होते. रीना रॉय म्हणतात, 'हा निव्वळ योगायोग आहे. कधी कधी असे घडू शकते. जितेंद्र कुमार यांची आई आणि माझी आई जुळ्या बहिणी असल्या सारखेच दिसते. त्यामूळे माझ्यात आणि सोनाक्षी मध्ये असलेले साम्य केवळ योगायोग समजावा, असे तिने चाहत्यांनी सांगितले.  

शत्रुघ्न आणि रीना यांचे गाजलेले प्रेमप्रकरण

'कालीचरण' चित्रपटानंतर रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. दोघांच्या प्रेमकथेची चर्चा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध व्हायची. मात्र, दोघांचे लग्न होऊ शकले नाही. या सगळ्या गोष्टीनंतर अनेक वर्षांनी आता पुन्हा एकदा ही गोष्ट चर्चेत आली आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनमसोबत लग्न केल्यानंतरही शत्रुघ्न सिन्हा त्यांचे पहिले प्रेम विसरू शकले नाहीत. रीनाला भेटायला ते अनेकदा गुपचूप जात असत. जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या 'एनिथिंग बट खामोश' या पुस्तकात रीना रॉय आणि शत्रुघ्न यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत.

'हातकडी' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा व्यतिरिक्त संजीव कुमार आणि रीना मुख्य भूमिकेत होते. जेव्हा हा चित्रपट हिट झाला तेव्हा पहलाज निहलानी यांनी या तिघांना त्यांच्या पुढच्या 'आँधी तुफान' चित्रपटात घेण्याचे ठरवले. पण रीनाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

रीनाने पहलाज निहलानीला सांगितले, 'तुमच्या मित्राकडे जा आणि त्यांना त्यांचे उत्तर विचारा. त्यांनी मला लग्नासाठी होकार दिला तरच मी या चित्रपटात काम करेन अन्यथा नाही.

त्यांना असेही सांगा की, जर त्यांनी मला नकार दिला तर मी येत्या 8 दिवसात दुसऱ्या कोणाशीतरी लग्न उरकून टाकेन. पहलाज यांनी रीनाचा हा निरोप शत्रुघ्न सिन्हा यांना दिला. ते ऐकून शत्रुघ्नजी चिडले आणि त्यांनी लगेच रीना यांना फोन केला. पण, ते फोनवर केवळ रडत राहिले.

एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, रीनासोबत त्यांचे नाते 7 वर्षे होते. लग्नाच्या अनेक वर्षानंतरही ते रीनाला भेटत राहिले. माझ्या पत्नीने मला दोनवेळा रीनासोबत रंगेहाथ पकडले होते. जेव्हा मी दुसऱ्यांदा पत्नीची फसवणूक करताना पकडलो गेलो. तेव्हा पुनमने मला मुलांचा विचार करण्यास सांगितले. त्यानंतर मी परत मागे वळून रीनाकडे पाहिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT