Sonalee Kulkarni Esakal
मनोरंजन

Sonalee Kulkarni: 'आमचं पाच वर्षांच रिलेशन होत पण...', त्यांनतर सोनालीनं कुणालसोबत केलं लग्न.. कोण होता 'तो'

सकाळ डिजिटल टीम

मराठी मनोरंजन विश्वामध्ये सोनाली कुलकर्णीनं अभिनयानं आणि सौंदर्यानं मराठी प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. ती मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. त्याचबरोबर आता ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिच्या अभिनयची जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे. सोनाली अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही बरिच सक्रिय असते. ती तिच्या चाहत्याच्या संपर्कात राहते.

ती तिच्या वैयक्तिक आयूष्यामुळेही बरिच चर्चेत असते. तिची आणि कुणालची जोडी प्रेक्षकांना खुप आवडते. मात्र कुणाल हा तिची पहिली पसंती नव्हती. होय याचा खुलासा खुद्द सोनालीनेच केला आहे.

सोनालीने नुकतचं एका मुलाखतीत तिच्या आधीच्या रिलेशनशिपबाबात काही गोष्टींचा खुलासा केला. तिने या मुलाखतीत ती एका मुलाच्या कशी प्रेमात पडली आणि पुढे त्याच्या नात्याचं काय झालं याबद्दल सांगितलं.

याबद्दल बोलतांना सोनालीने सांगितलं की, ती कॉलेजमध्ये असताना एका सिनियर मुलांच्या प्रेमात पडली. तिला वाटलं होतं की तो मुलगा तिला प्रपोज करेल मात्र त्यान तिला प्रपोज केल नाही त्यामुळं तिने पुढाकार घेतला आणि त्याला प्रपोज केल. त्यावर त्यानेही होकार भरला. त्यांनतर दोघांनी पाच वर्ष एकत्र छान वेळ घालवला.

पुढे ती म्हणते की, हे तिचं पहिलं सिरियस रिलेशन होतं. ते बराच काळ टिकलं. पण पाच वर्षांनंतर त्याच नातं संपल.

मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ७ मे रोजी दुबईतील एका मंदिरात कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईमध्ये अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात आणि मग कोर्टमध्ये त्यांनी विवाह केला होता. इतकचं नाही तर तिने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्यांदा कुणालसोबत लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT