Sonam Kapoor Happy Birthday Sonam Kapoor
Sonam Kapoor Happy Birthday Sonam Kapoor Esakal
मनोरंजन

Happy Birthday Sonam Kapoor: अनिल कपूरची लेक असूनही बॅक टू बॅक 6 चित्रपट फ्लॉप!मात्र नशीब पालटल ते 'या' अभिनेत्यामुळेच..

Vaishali Patil

Happy Birthday Sonam Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अनेक हिट चित्रपट तिने इंडस्ट्रीला दिले आहे.

तिची गणना आता आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये केली जाते. आज सोनम कपूर वाढदिवस आहे. ती आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या हिट आणि फ्लॉप चित्रपटांवर नजर टाकूया.

सोनम कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री तर मोठ्या बॅनर खाली केलाी मात्र तिला याचा काही खास उपयोग झाला नाही. सुपरहिट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पहिल्या 'सावरिया' या चित्रपटात सोनमसोबत रणबीर कपूरनेही डेब्यू केलं होतं. दोघांनीही आपापल्या परीनं खुप प्रयत्न केले पण हा चित्रपट फ्लॉप झाला.

अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिच्या वडिलांप्रमाणे सोनमही चित्रपटसृष्टी गाजवेल असं अनेकांना वाटलं होत मात्र तसं काही झालं नाही.

अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. तिच्या वडिलांप्रमाणे सोनमही रॉक करेल असे सर्वांना वाटत होते.

त्यांना इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या पहिल्या 'सावरिया' चित्रपटासाठी मिळाले.

सोनमसोबत रणबीर कपूरनेही या चित्रपटातून डेब्यू केला होता. दोघांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले पण हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही आणि चित्रपटगृहात फ्लॉप झाला.

सावरिया नंतर डेली-6, आयशा, थँक यू, मौसम आणि प्लेयर्स, या 6 चित्रपटातुन तिला निराशाच दिली. एकामागून एक फ्लॉपमुळे सोनम तर खचलीच त्याचबरोबर तिची इमेजही खराब होवु लागली.

त्यानंतर सोमनचा पहिला हिट चित्रपट ठरला तो साऊथ स्टार धनुषसोबतचा 'रांझना'. या चित्रपटात धनुष आणि सोनमची जोडी प्रेक्षकांना कमालिची आवडली.

एकामागून एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर जेव्हा सोनमचे नशीब रांजना चित्रपटामुळं चमकलं. त्यानंतर तिने फरहान अख्तरसोबत 'भाग मिल्खा भाग' हा सुपरहिट चित्रपट दिला.

या चित्रपटानंतर तर तिचं करिअर उंच शिखरावर पोहचल. त्यानंतर तिने सलमान खानसोबत 'प्रेम रतन धन पायो', 'निरजा' हे हिट चित्रपट दिले.

त्यानंतर तिने पुन्हा रणबीरसोबत 'संजू' या चित्रपटात काम केलं आणि तो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. हा तिचा शेवटचा हिट ठरलेला चित्रपट आहे.

आता सध्या सोनम चित्रपटात कमी सक्रिय आहे. ती शेवटची 'द झोया फॅक्टर ' चित्रपटात दिसली होती तसेच आता ती आगामी काळात ' ब्लाइंड ' या चित्रपटात दिसणार आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT