Sonam Kapoor express her feelings about Mr India 2  
मनोरंजन

'मिस्टर इंडिया २'बाबत सोनमने व्यक्त केली खंत, सोशल मिडियावर म्हणाली...

वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अली अब्बास जफरने मिस्टर इंडिया सिनेमाच्या रिमेकची घोषणा केली होती. त्यानंतर अली बराच चर्चेत राहिला.. यावर दिग्दर्शक शेखर कपूरने अलीला धारेवर धरल्यानंतर आता अभिनेत्री सोनम कपूरने देखील दिग्दर्शकावर निशाणा साधलाय.. खर तर सोनम या गोष्टीमुळे नाराज आहे की दिग्दर्शक अली अब्बास जफरने मिस्टर इंडियाच्या रिमेकसाठी सोनमचे वडिल अनिल कपूर यांनाच याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.. सोशल मिडियावर याबाबत सोनमने आपलं स्पष्ट मत मांडलंय...

सोशल मिडियावर सोनमने लिहीलंय की, 'मला खूपजण मिस्टर इंडियाच्या
रिमेकबाबत विचारत आहेत..माझ्या वडिलांना तर अशा कोणत्या रिमेकबाबत माहित देखील नाही..आम्हा सगळ्यांना हे तेव्हा कळालं जेव्हा या सिनेमाच्या
रिमेकबाबत अली अब्बास जफर यांनी ट्वीट केलं..यापुढे जाऊन सोनम सांगते, ही खरंच दुर्देवाची गोष्ट आहे की माझे वडिल अनिल किंवा काका शेखर
यांच्यासोबत याबाबत कोणी चर्चा देखील केली नाही..या दोघांचाही हा सिनेमा
बनवण्यात मोठा वाटा होता..ही खरंच खेदजनक बाब म्हणावी लागेल कारण मिस्टर इंडिया हा सिनेमा माझ्या वडिलांच्या अत्यंत जवळचा सिनेमा आहे आणि या सिनेमासाठी त्यांनी खूप मेहनत देखील घेतलीये..'

महत्वाची गोष्ट म्हणजे नुकतंच काही दिवसांपूर्वी सोनमच्या आधी मिस्टर
इंडियाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी देखील याबाबत आपली खंत व्यक्त केली होती.. शेखर यांनी ट्वीट करत असं लिहिलं होतं की, 'मिस्टर इंडिया २ बाबत कोणाकडूनही मला विचारणा झालेली नाही..मला असं वाटतं की सिनेमासाठी मोठा विकेंड बनवण्याच्या तयारीत या सिनेमाच्या नावाचा वापर केला जात आहे. मात्र कोणालाही सिनेमातील पात्र किंवा सिनेमाच्या कथेचा वापर खऱ्या निर्मात्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Road Accident : नववर्षाची पहाट भीषण अपघाताने, कोल्हापुरात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू

शिवसेनेला दणका! अहिल्यानगरमध्ये पाच एबी फॉर्म बाद; राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळेंचा मार्ग सोपा, विराेधकांना होणार फायदा!

संजय दत्तचे 5 प्रेम प्रकरणं! ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातलेला धुमाकूळ, माधुरी दीक्षितसोबत तर होणार होतं लग्न

Aries Horoscope : 'मेष राशी'ला साडेसाती सुरू; कसं असणार नवीन वर्ष? घाई-गडबडीत कोणतेही निर्णय घेतल्यास काय होणार?

PCMC Election: बंडखोरी टाळण्यासाठीचा डाव भाजपवरच कसा उलटला? पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं? ‘राष्ट्रवादीं’ची आघाडी यशस्वी?

SCROLL FOR NEXT