Sonam Kapoor and Anand Ahuja Sakal
मनोरंजन

Sonam Kapoor: 'दुसरी अपेक्षाचं नाही', मुलाचा फोटो शेअर करत सोनमची 'ती' पोस्ट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमध्ये फॅशनिस्टा म्हणून सोनम कपूर ओळखली जाते. अनेक जण तिला फॅशन आयकॉनही म्हणतात. तिने अभिनयानेही चाहत्यांवर भुरळ घातली आहे. सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. ति तिचा मुलगा वायूसोबत वेळ घालवतांना दिसतेय. मात्र त्याबरोबरच ती तिच्या व्यावसायिक आयूष्यातही सक्रिय आहे.

तिने वायूचा चेहरा उघड केला नसला तरी त्याच्यासोबतचे व्हिडिओ ती पोस्ट करत असते. नुकतेच तिने वायूसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहे. तिने या फोटोंसोबत दिलेल्या कॅप्शनची सध्या रंगली असून तिची पोस्ट व्हायरल होत आहे.

सोनम कपूरने तिचा मुलगा वायुची एक अतिशय गोंडस झलक इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे . वायु 6 महिन्यांचा पुर्ण झाल्यामुळं तिने आपल्या मुलासाठी एक अतिशय गोंडस पोस्ट लिहिली आहे. यासोबतच तिने मुलाची गोड झलकही दाखवली आहे. पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील आहे, ज्यामध्ये वायु कुर्ता पायजामा घालून खेळताना दिसत आहे.

सोनम कपूरने लिहिले तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, वायु ६ महिन्यांचा झाला आहे. जगातील सर्वोत्तम नोकरी…माझा सर्वात मोठा आशीर्वाद…माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझ्या प्रिय मुला…तुझे वडीलांनी आणि मी यापेक्षा जास्त काही मागीतलंही नव्हतं.”

सोनम कपूरच्या या पोस्टवर काही वेळातच लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. सोनमला ६ महिने पूर्ण झाल्याबद्दल तिच्या चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटीही सोनमचं अभिनंदन केलं आहेत.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा 20 ऑगस्ट 2022 रोजी पहिल्या वायूचे पालक झाले. तेव्हापासून सोनमने तिच्या मुलाचा फोटो अनेकदा शेअर केला आहे, पण कधीच चेहरा दाखवला नाही. आज शेअर केलेल्या फोटोमध्येही चेहरा स्पष्ट दिसत नाही, पण सोनमने यापूर्वी कधीही अशी झलक शेअर केली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

West Indies Tour India 2025 : वेस्ट इंडिज संघ ७ वर्षांनी भारतात येणार; दिग्गज खेळाडूच्या मुलाला संधी, १५ सदस्यीय संघाची घोषणा

Latest Marathi News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा गोंधळ

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT