Soni razdan felt guilty on marrying mahesh bhatt...
Soni razdan felt guilty on marrying mahesh bhatt... Google
मनोरंजन

Soni Razdan: महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राझदान यांना पश्चाताप; खुलासा करत म्हणाल्या होत्या...

प्रणाली मोरे

Soni Razdan: बॉलीवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांच्यात प्रेम झालं,मग लग्न केलं आणि मग घटस्फोट घेतला...पण काही कपल असेही आहेत जे नात्यातील दुराव्यासोबतच संसाराचा रहाटगाडगा ओढताना दिसतात,तर काहींना नातं जोडल्याचा पश्चातापही होतो. अनेकांना आपलं हे नातं नकोसं वाटतं. असंच झालं होतं आलिया भट्टची आई अभिनेत्री सोनी राझदानसोबत.

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा सोनी राझदान यांनी दोन मुलांचे वडील असलेल्या महेश भट्टवर प्रेम केलं आणि लग्न केलं होतं. एक वेळ होती जेव्हा सोनी राझदान यांच्याविषयी महेश भट्टच्या पहिल्या पत्नी किरण भट्ट यांच्या मनात खूप राग होता. पूजा भट्ट तर सोनी राझदानला डोळ्यासमोर पाहणं देखील पसंत करत नव्हती.(Soni razdan felt guilty on marrying mahesh bhatt...)

सोनी राझदान यांचा २५ ऑक्टोबरला ६६ वा वाढदिवस होता. या निमित्तानं त्यांच्या आयुष्यातील एक महत्तवाची गोष्ट शेअर केली. या घटनेनं सोनी राझदान यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम केला होता. सोनी राझदान ८० आणि ९० च्या काळातल्या प्रसिद्ध अभिनेत्री. त्यांनी काही सिनेमे देखील दिग्दर्शित केले होते.

सिनेमाच्या निमित्तानं एकत्र काम केल्यानं महेश भट्ट आणि सोनी राझदान यांच्यात प्रेमाचं नातं फुललं. त्यावेळी महेश भट्ट यांचे लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलं देखील होती. महेश भट्ट यांनी लॉरेन ब्राइट(म्हणजेच लग्नानंतरच्या किरण भट्ट) यांच्याशी लग्न केले होते. लॉरेन ब्राइट या महेश भट्ट यांच्या बालमैत्रिण होत्या.

लॉरेन ब्राइट यांच्याशी अनेक वर्षाचं प्रेमाचं नातं असूनही महेश भट्ट सोनी राझदान यांच्यात गुंतले. सोनी राझदानचं देखील महेश भट्ट यांच्यावर खूप प्रेम होतं,पण त्यांची पहिली पत्नी किरण भट्टचं मात्र त्यांना टेन्शन आलं होतं.

Soni razdan felt guilty on marrying mahesh bhatt... (small puja Bhatt In this Photo)

सोनी राझदान यांनी २४ वर्षांपूर्वी सिमी ग्रेवालच्या शो मध्ये बोलून दाखवलं होतं की कसं महेश भट्ट यांच्यासोबत त्यांचं रिलेशनशीप सुरु झालं आणि त्यावेळी त्यांची पहिली पत्नी किरण भट्ट कशा त्यांच्यावर नाराज होत्या. त्याच शो मध्ये महेश भट्ट यांनी देखील आपल्या रिलेशनशीपविषयी आणि वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते.

सोनी राझदानला सिमी ग्रेवालनं जेव्हा विचारलं होतं की,'महेश भटट्च्या पहिल्या पत्नी, मुलांच्या मनात त्यांच्याविषयी राग होता का?',तेव्हा सोनी राझदान म्हणाल्या होत्या,'' काही काळ माझ्याविषयी ते सगळे नाराज होते,पण जसा काळ पुढे सरकला तो राग कमी होत गेला. आता आमच्यात खूप चांगलं नातं आहे. पण सुरुवातीच्या दिवसांत खूप भांडणं झाली. जेव्हा आमचं लग्न नव्हतं झालं तेव्हा खूप प्रॉब्लेम्स होते. पण जेव्हा लग्न झालं,त्यानंतर हळूहळू आमच्या नात्यातही प्रेम निर्माण झालं''.

Soni razdan felt guilty on marrying mahesh bhatt...(Mahesh Bhatt with his first wife in this photo)

महेश भट्ट सिमी ग्रेवालच्या त्या मुलाखतीत म्हणाले होते, ''सुरुवातीला सगळेच नाराज होते. मुलं विचार करायची की सोनी खूप वाईट आहे,जिनं त्यांच्या वडीलांना त्यांच्यापासून लांब नेलं,.मी पण त्यांना तेव्हा अडवायचो नाही. त्यांना राग व्यक्त करून द्यायचो. मी माझी मुलगी पूजा पासून कधीच माझं अफेअर लपवलं नाही. तेव्हा ती फक्त १० वर्षांची होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला सोनीसोबत असलेल्या माझ्या नात्याविषयी सांगितलं. तेव्हा तिनं माझ्याकडे पाहून फक्त मान हलवली होती. मला माहित नाही तिचं तशाप्रकारे मान हलवण्याचा तेव्हा नेमका काय अर्थ होता''.

महेश भट्ट यांनी लॉरेन ब्राइट म्हणजे किरण भट्ट यांच्यासोबत १९६८ साली लग्न केलं होतं. दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचे. लग्नाच्या ४ वर्षांनंतर त्यांना पूजा भट्ट झाली. सगळं खूप छान सुरू होतं. पण 'सारांश' सिनेमाच्या सेटवर महेश भट्ट आणि सोनी राझदान यांच्या मध्ये प्रेम फुलत असल्याची बातमी तेव्हा वाऱ्यासारखी पसरली होती. त्यानंतर सोनी राझदान यांच्यासोबत महेश भट्ट यांनी लग्न केलं. सोनी राझदान यांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबियांच्या रागाचा देखील यावेळी सामना करावा लागला होता. महेश भट्ट यांचे पहिले लग्न,परवीन बाबी सोबतचं अफेअर यामुळे सोनी राझदान यांचे कुटुंबिय आपल्या मुलीच्या भविष्याविषयी चिंतेत होते, म्हणून सोनी राझदान यांनी महेश भट्ट यांच्यासोबत लग्न करू नये असं त्याच्या आई-वडीलांना वाटत होते.

Soni razdan felt guilty on marrying mahesh bhatt...

पूजा भट्ट देखील आपली सावत्र आई सोनी राझदान हिचा खूप राग करायची. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, ''मी खूप नशीबवान आहे की माझं बालपण फार अडचणींचे राहिले नाही. माझे आई-वडील खूप भांडायचे,घरात खूप मोठे वाद व्हायचे. पण मी गप्प राहून सगळं पहायची. मी त्यावेळी खूप लहान होते,काहीच करू शकत नव्हते. पण या सगळ्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. मी तेव्हा मोठी होत होते,मी या सगळ्या गोष्टींना माझ्या आयुष्याचा एक भाग मानू लागले होते. माझे आई-वडील मला सगळं सांगायचे,माझ्यापासून काही लपवून ठेवायचे नाहीत''.

पूजा भट्ट पुढे म्हणाली होती, ''बाबांनी आम्हाला का नाही सोडलं? याविषयी सांगायचं तर आई-बाबा यासाठी वेगळे झाले होते कारण ते एकमेकांसोबत राहू शकत नव्हते. आताही ते चांगले मित्र आहेत. ते आमच्या घरी येतात आणि आम्हाला आर्थिक रित्या देखील मदत करतात. सुरुवातीला मी बाबांवर नाराज होते कारण त्यांनी एका महिलेसाठी आम्हाला सोडलं होतं. मी सोनी राझदानचा खूप राग करायचे. एक काळ होता जेव्हा सोनीचं नाव घेताच मला राग यायचा. तेव्हा आई मला समजवायची की वडीलांचा राग करू नकोस कारण ते मनाने खूप चांगले व्यक्ती आहेत''.

सोनी राझदान यांनी महेश भट्टसोबत लग्न केलं,शाहीन आणि आलिया या दोन मुलींना जन्म दिला,पण त्यांच्या मनात काहीतरी सलत होतं. त्यांना एका गोष्टीचा पश्चाताप होत होता. महेश भट्ट यांच्याशी लग्न करणं आणि त्यांचं घर तोडणं त्यांना खूप मानिसक त्रास देत होतं. यासंदर्भात सोनी राझदान यांनी पूजा भट्टला आपल्या मनातील गोष्ट बोलूनही दाखवली होती. याचा खुलासा एका मुलाखतीत त्यांनी केला होता. सोनी राझदान जेव्हा पूजा भट्टसोबत एकदा रेकीसाठी कुनूरला जात होत्या तेव्हा त्यांनी आपल्याला पश्चाताप होत आहे असं पूजाला बोलून दाखविल होतं.

तेव्हा पूजा भट्टने सोनी राझदान यांना समजावलं होतं की, त्यांनी कोणाचं लग्न,घर तोडलं नाही. कारण तिच्या आई-वडीलांच्या नात्यात प्रेम राहिलं नव्हतं. पूजानं सोनी राझदान यांना समजावत म्हटलं होतं,माझ्या आई-वडीलांचे लग्न तर कधीचेच तुटले आहे. आज सोनी राझदान महेश भट्ट यांच्यासोबत एक सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. पूजा भट्ट आणि इतर कुटुंबियांसोबतही सोनी राझदानचे चांगले संबंध आहेत. आलियाच्या लग्नात हे आपण सगळ्यांनीच फोटोंच्या माध्यमातून अनुभवलं असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Lanke: खासदार निलेश लंकेंचा गुंड गजा मारणेने केला सत्कार, वाद निर्माण होण्याची शक्यता

Tata Group: टाटा समूहाच्या अध्यक्षांची मोठी भविष्यवाणी! 2030 पर्यंत लोकसंख्येचा 50 टक्के भाग...

Chandu Champion: 'चंदू चॅम्पियन' जिंकतोय प्रेक्षकांची मनं; नेटकरी म्हणाले, "कार्तिकचा आतापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स"

Maharashtra Politics: '...अन्यथा तुमचं सरकार अडचणीत येईल', भाजप नेत्याचा CM शिंदेंना इशारा, म्हणाले 'हीच योग्य वेळ...'

Benefits Of Namaste: मेलोनींकडून G7 च्या पाहुण्यांचे 'नमस्ते' म्हणत स्वागत, जाणून घ्या नमस्काराचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

SCROLL FOR NEXT