Sonu Sood Once again extended a helping hand to the fan who father in aiims hospital delhi  SAKAL
मनोरंजन

Sonu Sood: "तुझ्या बाबांना काही होणार नाही!" पुन्हा एकदा सोनू सुदने चाहत्याला दिलं मदतीचं आश्वासन

सोनू सूदने चाहत्याला दिलं मदतीचं आश्वासन, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Devendra Jadhav

Sonu Sood News: सोनू सूद हा भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. सोनूने कोविडच्या काळात केलेली मदत सर्वांना माहितच आहे. कष्टकरी कामगारांना घरी जाण्यासाठी सोनूने मदतीचा हात पुढे केला होता.

याशिवाय सोनू सूद विविध माध्यामांतुन लोकांना आर्थिक पाठबळ देत असतो. नुकतीच सोनूने अशी एक गोष्ट केलीय, ज्यामुळे त्याने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकलंय. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या.

सोनूने तरुणाला दिलं मदतीचं आश्वासन

नुकतंच ट्विटरवर एक गोष्ट घडली. एका तरुणाने सांगितले की, "माझे वडीलांची प्रकृती चिंताजनक आहे. ते मरणाच्या उंबरठ्यावर आहे. मी काय बोलतोय मला माहित आहे. दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील रांगेत उभा राहून हे मी बोलतोय. प्लीज वाचा."

या पोस्टवर अनेकांनी त्याला धीर दिलाय. हे लक्षात येताच सोनूने त्या ट्विटवर रिप्लाय दिलाय की, "मित्रा, आम्ही तुझ्या वडिलांना मरू देणार नाही. तुझे सर्व तपशील आणि फोन नंबर मला DM वर शेअर कर." असं म्हणत सोनूने मदतीचं आश्वासन दिले.

नेटिझन्सनी केलं सोनूचं कौतुक

सोशल मीडियावर नेटिझन्सनी सोनूचं कौतुक केले. एका युजरवर कमेंट करताना त्याने लिहिले की, 'सोनू भाई सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असतो.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'सोनू सर इतके चांगले आणि खरे व्यक्ती आहेत.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'सोनू सरांना माझा सलाम.'

अशाप्रकारे सोनूच्या कृतीचं सर्वांनी कौतुक केलंय.

सोनूचा आगामी सिनेमा

सोनू आगामी 'फतेह' या सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सोनू एका दमदार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

शक्ती सागर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जो सोनू सूदच्या स्वतःच्या होम प्रॉडक्शनचा आहे.

जॅकलिन फर्नांडिस या सिनेमात मुख्य भूमिकेत असुन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT