Sonu Sood Google
मनोरंजन

'सम्राट पृथ्वीराज' फ्लॉप होण्यामागे...' सोनू सूदनं दिली प्रतिक्रिया

'सम्राट पृथ्वीराज' सिनेमात सोनू सूदनं राजकवि चंदबरदाई ची भूमिका साकारली आहे.

प्रणाली मोरे

अक्षय कुमारचा(Akshay kumar) सिनेमा 'सम्राट पृथ्वीराज'(Samrat Prithviraj) बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. सिनेमात सोनू सूदनं(Sonu Sood) राजकवि चंदबरदाई ची भूमिका साकारली आहे. 'पृथ्वीराज'च्या प्रदर्शनानंतर आता सोनू सूद आपल्या पुढील प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त आहे. परंतू याच दरम्यान त्यानं 'सम्राट पृथ्वीराज' का चालला नाही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. सोनू सूद पहिल्यांदाही बोलला होता की,''फक्त सिनेमा चालला नाही असं म्हणून सोडून देता येत नाही. कारण तो सिनेमा तयार होताना सगळ्यांचे कष्ट लक्षात घेतले की त्याच्यावर बसलेला फ्लॉपचा(Flop) शिक्का मनाला खूप वेदना करून जातो. सगळी टीम त्या सिनेमासाठी मेहनत घेत असते ते एका झटक्यात वाया गेल्यासारखं होऊन जातं''.

'सम्राट पृथ्वीराज' फ्लॉप झाल्यानंतर सोनू सूद म्हणाला,''हा माझ्यासाठी खूप जवळचा,खास सिनेमा आहे. मला या सिनेमात खूप कमाल भूमिका साकारायचा अनुभव मिळाला. लोकांनी देखील माझी ही वेगळी भूमिका पसंत केली. मी त्यांचा खूप आभारी आहे. कदाचित बॉक्सऑफिसवर सिनेमानं चांगला व्यवसाय केला नाही जेवढी आम्ही अपेक्षा केली होती पण आपल्याला हे लक्षात घ्यायला हव की पॅन्डॅमिक नंतर खूप गोष्टी बदलल्या आहेत''.

सोनू सूद म्हणाला की,'' पृथ्वीराज सिनेमा केल्यामुळे मी खूप खूशीत आहे. आणि लोकांनी जे प्रेम सिनेमाला दिलं आहे त्याचाही मला आनंद आहे. आपल्या नवीन प्रोजेक्टविषयी अद्याप काही आपण बोलत नाही आहोत कारण मी स्वतः त्याविषयी खूप उत्सुक आहे. आणि लवकरच मी त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करेन. मी या प्रोजेक्टवर दिवस-रात्र काम करीत आहे. मी खूप कष्ट घेतलेयत''.

सोनू सूद म्हणाला की,'' ७ जून रोजी तो या सीक्रेट्ला सर्वांसमोर आणणार आहे. तोपर्यंत मी इतकंच म्हणेन की या प्रोजेक्टमुळे आपल्या मनात देशाचा अभिमान अधिक वाढेल. मला आशा आहे की मी ते सीक्रेट शेअर केल्यावर सगळ्यांकडून मला प्रेम आणि पाठिंबा मिळेल''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT