South actress arundhathi latest news esakal
मनोरंजन

Arundhathi Nair On Ventilator : 'माझ्या बहिणीसाठी देवाकडे प्रार्थना करा', साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अरुंधतीचा अपघात!

अरुंधतीच्या बहिणीनं आता सोशल मीडियावर पोस्ट करुन बहिणीच्या अपघाताविषयी माहिती दिली आहे.

युगंधर ताजणे

South actress arundhathi nair : दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती नायरच्याबाबत (South actress arundhathi nair news) एक मोठी बातमी समोर आली आहे. तिचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून त्यात तिला गंभीर दुखापत झाली आहे. अरुंधतीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुंधती ही सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे (Latest Marathi News) सांगण्यात येत आहे. अशातच अरुंधतीच्या बहिणीनं आरती नायरनं सोशल मीडियावर पोस्ट करत अरुंधतीच्या चाहत्यांना देवाकडे प्रार्थना करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. तिची ती पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. अरुंधतीचा १४ मार्च रोजी अपघात झाला. आता ती त्रिवेंद्रम येथील अनंथापुरी रुग्णालयात उपचार घेत आहे.

अरुंधतीची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांच्या (Tollywood Actress) मनावर उमटविणाऱ्या अरुंधतीच्या चाहत्यांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. तिच्या प्रकृतीविषयी बहीण चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. याबाबत आज तकनं सविस्तर वृत्त दिले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितानुसार, कोवलम बायपास येथे अरुंतीचा अपघात झाला. असं म्हटलं जात आहे की, अरुंधती ही एका युट्युब चॅनेलला मुलाखत देऊन घरी परतत होती. त्यावेळी तिचा अपघात झाला. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. काल अरुंधीतीची बहीण आरतीनं एक पोस्ट शेयर करुन अरुंधतीच्या अपघाताविषयी माहिती दिली आहे. त्यामध्ये तिनं अरुंधतीच्या सद्यस्थितीबाबत सांगितले आहे.

आरतीनं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, माझी बहीण अरुंधती हिची प्रकृती कशी आहे हे तुम्हाला सांगावं लागेल. ती सध्या जीवघेण्या परिस्थितीला सामोरी जात आहे. सगळीकडे तिच्याविषयी वेगवेगळ्या बातम्यांना उधाण आले आहे. तिला अपघात होऊन गंभीर दुखापत झाली आहे. अरुंधती या संकटातून सुखरुप बाहेर यावी, बरी व्हावी यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. असे आवाहन आरतीनं अरुंधतीच्या चाहत्यांना केलं आहे.

अरुंधतीच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झाल्यास तिनं तमिळ चित्रपट पोंगी इजू मनोहारा नावाच्या चित्रपटातून २०१४ मध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर ती २०१८ मध्ये विजय अंथनीच्या शैतान नावाच्या फिल्ममुळे चर्चेत आली होती. तिला त्या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. आयराम पोरकासुकल हा आरतीचा शेवटचा चित्रपट होता. तो गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Mumbai Local Megablock: रविवारी रेल्वे प्रवाशांना फटका बसणार, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक; वेळापत्रकात बदल

Beed Lawyer News: सरकारी वकिलाने जीव दिल्याच्या प्रकरणात न्यायाधीशावर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

'वीण दोघांतली...'साठी विचारणा झाल्यावर तेजश्रीने २४ तास काहीच उत्तर दिलं नाही; कारण सांगत म्हणाली- त्या एका दिवसात...

Karad News : पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील मतांची एकदा नव्हे, दोनदा नव्हेत तर तीन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी; भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आरोप

SCROLL FOR NEXT