Shruti Haasan Marriage Plan esakal
मनोरंजन

Shruti Haasan Marriage Plan: लग्न करण्यास का घाबरते श्रृती हासन ? नेमकं काय आहे प्रकरण ?

श्रृतीच्या पालकांमुळे ती लग्नाला घाबरते असा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता.

सकाळ डिजिटल टीम

साऊथ अभिनेत्री श्रृती हासन ही सध्या तिच्या 'सालार' या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. तिच्या या चित्रपटात बाहुबली सुपरस्टार प्रभास असणार आहे. प्रभास आणि श्रृती हे पडद्यावर एकत्र दिसणारे दोन्ही कलाकार सध्या सिंगल असून त्यांच्या वेडिंग प्लॅनची विचारणा त्यांच्या चाहत्या वर्गाकडून केली जात आहे. बॉलीवुडमध्ये आपला अनोखा परिचय देणाऱ्या श्रृतीने तिच्या लग्नाचा प्लॅन विचारणाऱ्या नेटकऱ्यांना यावेळी चांगलच सुनावलं आहे. (Shruti Haasan Marriage Plan)

काय होतं श्रृती हासनचं नेटकऱ्यांना उत्तर ?

तुम्ही लग्न कधी करणार असा प्रश्न एका इन्स्टाग्राम सेशनमध्ये श्रृतीला विचारण्यात आला होता.यावर चिडून श्रृती म्हणाली,'तुम्ही हा प्रश्न विचारणं कधी बंद कराल.' या सेशनमध्ये अभिनेत्रीने तिचा चेहरा झाकला असल्याने तिच्या चेहऱ्याचे हावभाव यावेळी नेटकऱ्यांना दिसले नसले तरी तिच्या या सडेतोड उत्तराने नक्कीच नेटकऱ्यांना गप्प व्हायला भाग पाडलं होतं.याआधीही श्रृतीला एका मुलाखतीत तिच्या लग्नाबाबत विचारणा करण्यात आली होती.तेव्हाही श्रृतीने माझा लग्नाचा सध्या कुठलाही विचार नाही असे उत्तर दिले होते.(Shruti Hasaan Answered to netizens)

लग्न करण्यास का घाबरते श्रृती ?

श्रृतीच्या पालकांमुळे ती लग्नाला घाबरते असा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता.लग्नाच्या विषयात खरं तर माझे विचार माझ्या पालकांमुळे प्रभावित झाले आहेत.श्रृतीचे आई बाबा एके काळी एक चांगलं जोडपं म्हणून इंडस्ट्रीमध्ये जाणल्या जात होतं.पण त्यांचं लग्न दिर्घ काळ टिकू शकलं नाही.त्यामुळे लग्नाचा विषय मला नकोसा वाटतो.एका मुलाखतीदरम्यान तिला लग्नाबाबत विचारणा केली असता ती म्हणते 'लग्नाचा विषय मला अस्वस्थ करतो.त्यामुळे ती सध्या लग्नाचा कुठलाच विचार तिच्या मनात नाही.'

श्रृती सध्या शांतनु हजारिकाला डेट करतेय.हे दोघे २०२० पासून एकमेकांना ओळखतात.या दोघांत चांगली बाँडिंग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT